बसस्थानकातून 8 तोळे सोने लंपास; चोरट्या महिला CCTVमध्ये कैद

बसस्थानकात प्रवासी महिलेच्या पर्समधून अज्ञात तीन भामट्या महिलांनी सुमारे तीन लाख नऊ हजाराचे आठ तोळे सोने लंपास केले.
Theft
Theft esakal

पारोळा (जि. जळगाव) : येथील बसस्थानकात प्रवासी महिलेच्या पर्समधून अज्ञात तीन भामट्या महिलांनी सुमारे तीन लाख नऊ हजाराचे आठ तोळे सोने लंपास केले.

याबाबत म्हसवे येथील आशाबाई विश्वास पाटील यांनी फिर्याद दिली, की सोमवारी (ता.२७) दुपारी बाराच्या सुमारास धुळे येथे आपल्या सुनेस भेटण्यासाठी पारोळा बसस्थानकात आले असता साडेबाराच्या सुमारास बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत तीन अज्ञात महिलांनी महिलेच्या हातात असलेली पर्स ओढून चार तोळ्यांचा सोन्याचा हार, चार तोळ्याच्या बांगड्या, राणी हार व अंगठी असे एकूण आठ तोळे सोने (किंमत सुमारे तीन लाख नऊ हजार) त्यांनी लंपास केले. याबाबत बसस्थानकात महिलेने आरडाओरड देखील केली. परंतु तोपर्यंत चोरट्या महिला पसार झाल्या होत्या. घटनास्थळी काही वेळात पोलिस आले असता त्यांनी लगेच सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्या ठिकाणी तीन अज्ञात महिलांनी पाळत ठेवून चोरी केली असल्याची निर्दशनास आले.

Theft
'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल...' आता गाणंबी व्हायरल

सर्वत्र शहरात पोलिसांनी शोध घेतला असता महिला आढळून आल्या नाहीत. या बाबत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हवालदार प्रवीण पाटील करीत आहे.

Theft
कजगावला जनरेटर चोरीचा प्रयत्न फसला; चोरटे पसार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com