
Jalgaon : किराणा दुकान फोडून रोकड लांबविली
जळगाव : शिवाजीनगरातील किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ड्राव्हरमधून ९० हजारांची रोकड लांबविल्याची (Burglary) घटना उघडकीला आली आहे. याबाबत चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Grocery store burglarized jalgaon crime news)
शहरातील शिवाजीनगरातील क्रांती चौकात आनंद मदनलाल नागला यांचे मदनलाल पांडुरंग नागला या नावाने किराणा दुकान आहे. शुक्रवारी (ता. १) त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन ते घरी गेले. शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी ते दुकानावर आले असता, त्यांना दुकानाचे शटर मध्यभागून उचकविलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी तत्काळ दुकानात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना गल्ल्यातून पैसे चोरी झाल्याचे कळताच नागला यांनी शेजारच्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी काहीच माहीत नसल्याचे सांगताच नागला यांना दुकानात चोरी झाल्याची खात्री झाली.
हेही वाचा: सीपेट प्रकल्पाला भुजबळांकडून खोडा; खासदार हेमंत गोडसे यांचा आरोप
चोरट्यांनी नागला यांच्या दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले ८५ हजारांची रोख रक्कम व ५ हजारांची चिल्लर असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल लांबविल्याचे दिसून आले. नागला यांनी तत्काळ घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर आनंद नागला यांच्या तक्रारीवरून शनिवारी (ता. २) दुपारी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: बंडखोरांना जिवंतपणी दाखवले अमरधाम
Web Title: Grocery Store Burglarized Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..