Jalgaon Water Shortage : जुलै, ऑगस्टमध्ये पाणीटंचाई? दुसरा पाणीटंचाई विशेष कृतिआराखडा तयार

Water Shortage
Water Shortageesakal

Jalgaon News : ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर यंदाचा उन्हाळा कडक राहील. त्यामुळेच जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा अधिकच लांबण्याची शक्यता आहे.

यामुळे जुलै ते ऑगस्टमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण यंत्रणेने वर्तविली आहे. (groundwater survey system has predicted possibility of water shortage in July to August jalgaon news)

यामुळे वरील महिन्यांत ५५६ गावांत पाणीटंचाईचा प्राथमिक अंदाज आहे. टंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन कोटी ४२ लाख रुपयांचा विशेष टंचाई कृतिआराखडा तयार केला आहे. लांबणारा पाऊस लक्षात घेता जिल्हा प्रशासनाला यंदा दोन टंचाई आराखडे तयार करावे लागले आहेत.

एप्रिल ते जूनदरम्यान जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू नये, यासाठी दोन कोटी ४४ लाख रुपयांचा पहिला संभाव्य टंचाई कृतिआराखडा तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आता नुकताच तीन कोटी ४२ लाख रुपयांचा विशेष पाणीटंचाई कृतिआराखडा तयार केला आहे.

जिल्ह्यातील गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तापमानवाढीला काहीअंशी ब्रेक लागला. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्याचे तापमान ४० अंशांखालीच राहिले. असे असले तरी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होईल. अतितापमानाने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. दुसरीकडे भूगर्भातील पाणीपातळी खालावत आहे. सध्या जिल्ह्यात नऊ गांवाना दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Water Shortage
Jalgaon News : उपमहापौरांनीच अधिक निधी आपल्या प्रभागात वापरला; पोकळेंचा आरोप

टंचाईग्रस्त गावे व टँकरची संख्या अशी

* मोरगाव, रोटवद, नेरी दिगर (ता. जामनेर) - तीन

* तळबंदतांडा, वसंतवाडी (ता. भडगाव) - दोन

* एनगाव (ता. बोदवड) - एक

* हनुमंतखेडा, खेडीढोक (ता. पारोळा) - दोन

* मौजे पिंपळगाव (ता. चाळीसगाव) - दोन

तात्पुरत्या पाणीयोजना

मौजे हातगाव भिल्ल वस्ती (ता. चाळीसगाव) व मौजे लोणवाडी बुद्रुक (ता. जळगाव) या दोन ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत.

"अल निनो’च्या प्रभावामुळे यंदाचा उन्हाळा कडक राहणार आहे. पावसाळा लांबण्याची चिन्हे आहेत. यामुळे आम्ही जुलै, ऑगस्ट महिन्याचा विशेष टंचाई आराखडा तयार केला आहे. महापालिका, पालिकांना पाणीकपातीचे आदेश दिले आहेत. वाया जाणाऱ्या पाण्यावर उपाययोजना करण्यास सांगितले आहे." -अमन मित्तल, जिल्हाधिकारी

Water Shortage
Jalgaon News : कच्‍ची चारी कोरून सांडपाणी काढण्याचा घाट; महापालिकेचा अजब कारभार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com