Jalgaon News | शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता आणणार : गुलाबराव देवकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulabrao Devkar

Jalgaon News | शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता आणणार : गुलाबराव देवकर

जळगाव : पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक लागवड व शेतीपूरक उद्योगांतून आर्थिक सुबत्ता आली आहे. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्येही जिल्हा बँकेच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणण्याचा आपला प्रयत्न आहे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून सुरू केलेल्या देवकर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून कमी खर्चात जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. देवकर म्हणाले, की जिल्हा बँक ९७ कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. शिवाय एनपीए ४९ टक्के होता, तो आता ४४ टक्क्यांवर आणला आहे. बँकेला संपूर्ण तोट्यातून बाहेर काढण्याचा आपला प्रयत्न आहे. यासाठी आपण बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता विक्री करून त्यातून तोटा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. (Gulabrao Deokar Bring financial stability to farmers Trying to pull District Bank out of losses Jalgaon News)

हेही वाचा: Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

केवळ मालमत्ता विक्री करण्याचा उद्देश नाही, तर त्या सुरू होऊन त्या भागातील पिकांना बाजारपेठ मिळावी, कामगारांना रोजगार मिळावा हा उद्देश आहे. बँकेच्या ताब्यात असलेल्या जे. टी. महाजन सतूगिरणी विक्रीतून साडेसात कोटी रुपये मिळाले आहेत. मधुकर सहकार साखर कारखाना गेल्या तीन ते चार वर्षांपासून बंद आहे. बँकेचे ६३ कोटी रुपये घेणे असल्याने हा कारखाना सिक्युटायरझेशन ॲक्टखाली ताब्यात होता.

हा कारखाना सुरू व्हावा, यासाठी बँकेने नियमांप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाईन लिलाव केला. त्यातून बँकेला ६३ कोटी रुपये मिळतील. जे. टी. महाजन सूतगिरणी विक्रीतील साडेसात कोटी, मसाका विक्रीतून ६३ कोटी, असे साधारणत: एकूण ७० कोटी तोट्यातून वजा होतील. तर येत्या आर्थिक वर्षात २७ कोटी रुपये नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

त्यामुळे मार्च २०२३ अखेर बँक संपूर्णपणे तोट्यातून बाहेर येईल. काही प्रमाणात एनपीए होईल. बँक ‘ब’ वर्गातून ‘अ’ वर्गात येईल. मात्र, शासनाने कारखाना विक्रीच्या व्यवहाराला ‘स्टे’ दिल्याची माहिती मिळाली आहे.

आमची सरकारला विनंती राहील, की सरकारने ‘स्टे’ रद्द करावा. हा कारखाना सुरू झाल्यास ऊस लागवडीमुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता येईल, तसेच कामगारांना रोजगार मिळेल. परिसरात लहान- मोठ्या उद्योगांना चालना मिळेल. हा या मागचा प्रामाणिक उद्देश आहे. राजकारण न आणता सरकारने शेतकरी व कामगार हितासाठी मदत करावी, अशी आमची मागणी आहे.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Gautam Adani News : आधी वीज, मग गॅस, आता गौतम अदानी पोहोचवणार प्रत्येक घरात...

‘वसाका’ सुरू करण्याच्या अटीवर विक्री

वसंत सहकारी साखर कारखानाही कर्जापोटी बँकेच्या ताब्यात आहे. कायदेशीर पूर्तता करून हा कारखानाही विक्री करण्यासाठी प्रयत्न राहील. गेल्या १५ ते २० वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. तो सुरू करण्याच्या अटीवरच विक्री करण्यात येईल. या कारखानाही सुरू झाल्यास एरंडोल, धरणगाव, कासोदा परिसरातील कार्यक्षेत्रात मोठी उलाढाल हाईल. विक्रीनंतर जिल्हा बँकेच्या नफ्यात वाढ होण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न

शेतकऱ्यांच्या विकासाबाबत देवकर म्हणाले, की शेतकऱ्यांना आता वन टाईम कर्ज सेटलमेंटची सुविधा दिली आहे. त्यासाठी १५ ते १८ टक्क्यांऐवजी फक्त ११ टक्के दराने व्याजदर आकारण्यात येईल. गटसचिवांच्या वेतनाचाही प्रश्‍नही लवकरच सोडविण्यात येईल. २५ लाखांपेक्षा कमी अनिष्ठ तफावत असलेल्या विविध कार्यकारी संस्थांतील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट कर्ज देण्यात येईल. संस्था किंवा कंपन्याही सुरक्षित तारण ठेवून कर्ज देण्याचे धोरण आखण्यात येईल व शेतीपूरक उद्योगांनाही चालना देण्यात येईल.

जनतेला आरोग्य सुविधा

जनतेच्या आरोग्य सुविधेबाबत देवकर म्हणाले, की श्रीकृष्ण शैक्षणिक सांस्कृतिक मंडळातर्फे सुरू केलेल्या देवकर मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा आपला उद्देश आहे. शिवाय जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपला सतत संपर्क आहे. या भागातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी आपला सतत प्रयत्न राहणार आहे.

हेही वाचा: Municipal Corporation News : दरमहा सहा लाख खर्च, शौचालय साफसफाईची बोंबाबोब