...अन्‌ गुलाबराव पाटील कीर्तनाला उभे राहिले!

gulabrao patil
gulabrao patilesakal
Updated on: 

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यातील रसिक आणि परमेश्‍वरावर नितांत श्रद्धा असणारा भाविक ही रूपे अनेकदा दिसून येतात. ते अनेकदा जसे चित्रपटातील गाणी म्हणतात, तसेच भजन, कीर्तनातही रंगतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कव्वालीच्या माध्यमातून भक्तीरंगाचे प्रदर्शन घडविले होते. आता अगदी याच प्रकारे अंजनविहिरी (ता. धरणगाव) येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहात मंत्री पाटील यांनी थेट कीर्तनात भाग घेऊन उपस्थितांना चकित केले.

जीवनात परमेश्‍वर भक्ती खूप महत्त्वाची - पाटील

कीर्तनाच्या माध्यमातून संस्कारक्षम जीवनाची दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी जीवनातील परमेश्‍वर भक्तीवर केलेले भाष्य उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले. याच कार्यक्रमात त्यांना दहीहंडीचा सन्मानदेखील प्रदान करण्यात आला. निमित्त होते भागवत सप्ताहाच्या सांगता समारोहाचे. या निमित्त सकाळी काल्याचे कीर्तन सुरू असताना पालकमंत्री पाटील यांनी या संपूर्ण कीर्तनाला उपस्थिती नोंदविली. या ठिकाणी ते दोन तास उपस्थित होते. ते म्हणाले, की जीवनात परमेश्‍वर भक्ती खूप महत्त्वाची आणि आपल्याला ऊर्जा प्रदान करणारी आहे. आपण वर्षभरातून साधारणतः पन्नासेक ठिकाणी कीर्तनाला हजेरी लावत असतो. कीर्तन हे प्रबोधनाचे अतिशय परिणामकारक साधन आहे. कीर्तनातील ज्ञानाचा आपल्याला वैयक्तिक आयुष्यात लाभ झाला असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

gulabrao patil
गिरणा परिक्रमा एक चांगली सुरवात...
gulabrao patil
जळगाव : येऊ द्या कोरोना, आम्ही मास्क लावणारच नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Four Suspects Held by Jalgaon Police
Nandurbar bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com