Jalgaon Crime News : जळगावातूनच गुटख्याची तस्करी; 2 कारवायात 3 लाखांचा गुटखा जप्त

दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या मुकेश डालर रायसिंग (वय ३७, रा. संगम सोसायटी, रिंगरोड) याला जिल्हापेठ पोलिसांनी पकडले.
Gutkha smuggling from Jalgaon worth 3 lakh seized in 2 operations crime news
Gutkha smuggling from Jalgaon worth 3 lakh seized in 2 operations crime newsesakal

Jalgaon Crime News : दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या मुकेश डालर रायसिंग (वय ३७, रा. संगम सोसायटी, रिंगरोड) याला जिल्हापेठ पोलिसांनी पकडले. ही कारवाई शनिवारी सकाळच्या सुमारास रिंगरोड परिसरात केली.

यांच्याकडून १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gutkha smuggling from Jalgaon worth 3 lakh seized in 2 operations crime news)

शहरातील रिंगरोड परिसरात जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रवीण पाटील, कैलास शिंदे शनिवार(ता.१३) हद्द गस्तीवर असताना संशयावरून दुचाकीस्वारास थांबविले असता, त्याच्या जवळ राज्यात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा आढळला.

दुचाकीस्वार संशयित मुकेश रायसिंग हा तरुण (एमएच १९ सी डी ०२७७)याची कसून चौकशी केल्यावर त्याने हा माल शहरातील वसंतशेठ यांच्याकडून घेतल्याचे चौकशीत सांगितले.

तसेच त्याच्याजवळ सुमारे ३६ हजारांचा गुटख्यास ७५ हजारांची दुचाकी असा १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सिंधी कॉलनीत दिड लाखांचा गुटखा

दुसऱ्या घटनेत शहरातील सिंधी कॉलनी येथील गुटख्याच्या गोदामावर छापा मारुन एमआयडीसी पोलिसांनी दीड लाखांचा गुटखा जप्त केला.

Gutkha smuggling from Jalgaon worth 3 lakh seized in 2 operations crime news
Nashik Crime : दुचाकी एजंटला खंडणीसाठी दमबाजी! दोघांना 24 तासात अटक; दोन जण फरार

या प्रकरणी दोन संशयीतांना अटक करण्यात आली तर तिसरा फरार झाला.

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात खुशी निवास येथे गुटख्याची होलसेल साठवणूक आणि विक्री होत असल्याच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे.

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील यांच्या सह पथकाने छापा टाकून ९२ हजार ८९२ रुपयाचा माल भाजीपाला मार्केट येथील खुशी किराणा येथून जप्त केला. त्या सोबत १ लाख ५१ हजार ७९४ रुपये असा एकुण २ लाख ४४ हजार ६८६ रुपयांचा ऐवज या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

दुकानदार रमेश जेठानंद चेतवाणी, दिपक रमेश चेतवाणी अशा दोघा पितापुत्रांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Gutkha smuggling from Jalgaon worth 3 lakh seized in 2 operations crime news
Sand Mafiya Crime: वाळू माफिया मोकाट! कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी, दोन दिवसांत दुसरी घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com