Independence Day 2022 | जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘हर घर तिरंगा’ झळकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Har Ghar Ghar Tiranga

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘हर घर तिरंगा’ झळकणार

जळगाव : शहरासह जिल्ह्यात उद्या पासून (ता.१३) ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर झेंडा’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयासह घरांवर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह नागरिकही सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ९ लाख मिळकतीवर झेंडा फडकविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

जळगाव महापालिका, जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या २ लाख ८५ हजार २३५ असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील घरांची संख्या ६ लाख ८० हजार १५६ इतकी असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर ७ लाख ६५ हजार ७२७ राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १ लाख ९९ हजार ६६४ लाख राष्ट्रध्वजापैकी १ लाख ७५ हजार राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले आहेत.

हेही वाचा: अमृत महोत्सवी वर्षं साजरे करण्यासाठी बच्चे कंपनीत जल्लोष

सकाळपासूनच शासकीय कार्यालयावर झेंडा फडकविण्यास सुरवात होईल. नागरिक ही आपापल्या परीने घरांवर ध्वजवंदन करतील. यासाठी आज नागरिकांनी विविध ठिकाणी मिळणारे झेंड खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. २५ ते ३० रूपये दरम्यान दोन बाय तीन आकाराचे तिरंगे तर मोठ्या आकारचे झेंडे पन्नास ते दोनशे रूपयांदरम्यान उपलब्ध होते.

विविध स्पर्धांचे आयोजन

१३ ते १५ या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियानातून देशभक्तीची ज्योत तयार होईल असे मानले जात आहे. दूसरीकडे देशाप्रती अभिमान म्हणून शाळा, महाविद्यालये, खासगीरित्या वक्तृत्व स्पर्धा, भक्तीपर देशगीत गायन स्पर्धा, चित्रकला पोस्टर स्पर्धा घेण्यात येत आहे.

हेही वाचा: स्वातंत्र्याचा खरा अनुभव !

Web Title: Har Ghar Tiranga Independence Day Swatantryacha Amrut Mahotsav 2022 In Jalgaon District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonIndependence Day