Jalgaon : नगरसेवक अपात्र प्रकरणी 1 सप्टेंबरला सुनावणी

Jalgaon Municipal Corporation latest marathi news
Jalgaon Municipal Corporation latest marathi newsesakal

जळगाव : महापालिकेतील नगरसेवक अपात्रतेप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांकडे सुरू असलेली सुनावणी आता एक सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. (Hearing on September 1 case of corporator disqualification Jalgaon Latest marathi news)

Jalgaon Municipal Corporation latest marathi news
Dhule : होळनांथेच्या तलाठ्याला लाच घेताना पकडले

जळगाव महापालिकेत भाजपच्या ५७ नगरसेवकांपैकी २७ नगरसेवकांनी पक्षांतर करून शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेचे महापौर नियुक्त आले होते. भाजपतून फुटून गेलेल्या २७ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भाजपने नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती.

तर फुटीर भाजप नगरसेवकांनीही आम्ही दोन तृतीयांशपेक्षा अधिक असल्याने आम्ही मुळ भाजप आहोत, अशी याचिका नाशिक विभागीय आयुक्तांकडे दाखल केली होती. या शिवाय गटनेतेपदाच्या वादाबाबत औरंगाबाद खंडपीठात असलेली याचिकासुध्दा न्यायालयाने विभागीय आयुक्तांकडे निकालासाठी पाठविली आहे.

यावर आता दहा आठवड्यात निर्णय देण्याचे आदेशही देण्यात आले आहे. नाशिक विभागीय आयुक्तांकडे या याचिकेवर मंगळवारी (ता. २३) सुनावणी होती. यावेळी दोन्ही गटाच्या नगरसेवकांचे प्रतिनिधी हजर होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी एक सप्टेंबर रोजी होणार आहे.

Jalgaon Municipal Corporation latest marathi news
हायड्रोलिक शिडी खरेदीत अनियमितता; मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com