Jalgaon Accident News : सुसाट ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर | Husband dies in collision Fast truck wife seriously Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Jalgaon Accident News : सुसाट ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

Jalgaon News : राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी (ता. धरणगाव) येथील जैन कंपनीसमोर सुसाट ट्रकने पुढे दुचाकीद्वारे जात असलेल्या पती-पत्नीस जोरदार धडक दिली.

या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी आहे. शनिवारी (ता. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. (Husband dies in collision Fast truck wife seriously Jalgaon News)

मृत पतीचे नाव हेमंत काशिनाथ चौधरी (वय ५०, रा. खोटेनगर, जळगाव) असे असून, अपघातात जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी माधवी (वय ४५) यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.

श्री. चौधरी हे पोलनपेठेत खासगी मेडीकल डिस्ट्रीब्युटरकडे नोकरीस होते. तर, पत्नी माधवी बांभोरी गावाजवळील जैन कंपनीत कामावर आहेत.

शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नेहमीप्रमाणे पत्नीला कंपनीत सोडण्यासाठी चौधरी हे दुचाकीने जैन कंपनीकडे दुचाकीने निघाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कंपनीजवळ पोहचले असतानाच बांभोरीकडून सुसाट वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत चौधरी दाम्पत्य दुचाकीसह रस्त्याच्या खाली फेकले जाऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

स्थानिक ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

तेथे उपचार सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झालेली नव्हती. तर, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी होती.