Jalgaon News : नशिराबाद-तरसोदमध्ये पाण्यावरून पेटणार संघर्ष? अधिकाऱ्यांच्या चुकीने समस्या

dam
dam esakal

Jalgaon News : धरणात पुरेसा पाणीसाठा नाही, त्यात तो नशिराबादला पुरत नसताना त्याच धरणावरून जलजीवन मिशन योजनेंतर्गत तरसोद गावासाठी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे कायम पाणीटंचाईचा सामना करीत असलेले नशिराबाद व तरसोदच्या नागरिकांत येणाऱ्या काळात पाण्यासाठी संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. (possibility of conflict for water between citizens of Nasirabad and Tarsod for water jalgaon news)

गेल्या वर्षी २० मार्चला जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तरसोद गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत योजना मंजूर केली व त्यासाठी लागणारे पाणी नशिराबादच्या मुर्दापूर धरणातून घेण्याचे ठरले.

मुर्दापूरची क्षमता नाही

प्रत्यक्षात मुर्दापूर धरणाचा जलसाठा फक्त ११० दक्षलक्ष घनमीटर आहे. त्यात नशिराबाद गावाची पाणीपुरवठा योजना आजही तेथून सुरू आहे. उन्हाळ्यात या धरणात फक्त १५ ते २० टक्के पाणीसाठा असतो. गेल्या दहा वर्षांत हे धरण दोनवेळा कोरडे होते. अशी परिस्थिती असताना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ही योजना नशिराबद मुर्दापूर धरणऐवजी शेळगाव बॅरेज किंवा वाघूर धरण येथून मंजूर करायला हवी होती.

तशी मागणी तरसोद ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे केली होती. वास्तविक जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नशिराबाद गावातील लोकप्रतिनिधी, नगरपरिषदच्या प्रशासकांशी धरणातील उपलब्ध पाण्यासंदर्भात चर्चा करणे अपेक्षित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

dam
Sakal Exclusive : स्वस्तातच्या नावाखाली सामान्यांच्या डोळ्यांत ‘वाळू’फेक!

अधिकाऱ्यांच्या चुकीने समस्या

ही योजना नशिराबाद मुर्दापूर धरणावरून झाली, तर अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये पाण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निव्वळ ठेकेदाराला काम करणे सोपे जावे, या उद्देशाने धरणात पाणीसाठा नसूनही योजना अधिकाऱ्यांनी मंजूर केली.

शेळगाव, वाघुरचा पर्याय

या योजनेसंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन तरसोद गावासाठी शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या शेळगाव बॅरेज किंवा वाघूर धरणावरून योजना प्रस्तावित करावी व नशिराबाद येथील प्रस्तावित केलेल्या योजनेवरील शासनाचा पैसा पाण्याअभावी वाया जाणार नाही, याची शहानिशा करून अधिकाऱ्यांना तत्काळ योग्य त्या सूचना कराव्यात, असे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांना दिले आहे.

निवेदनावर योगेश पाटील, भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, माजी सरपंच विकास पाटील, भाजयुमो अध्यक्ष किरण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा महाजन, चंद्रकांत भोळे, सुकलाल कोळी, विकास धनगर, पुरुषोत्तम चौधरी, चंद्रकांत पाटील, जनार्दन माळी, विनोद पाटील, जितेंद्र महाजन यांच्या सह्या आहेत.

dam
Railway Bottle Water : रेलनिलव्यतिरिक्त बाटलीबंद पाण्याचे आणखी 9 ब्रँड; रेल्वे प्रशासनाची माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com