Jalgaon Crime : पत्नीच्या खुनात संशयीत पतीला आजन्म कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband Sentenced life imprisonment

Jalgaon Crime : पत्नीच्या खुनात संशयीत पतीला आजन्म कारावास

जळगाव : चरित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने भोसकून खून (Murder) करणाऱ्या पतीविरुद्ध दाखल खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायालयाने (District Court) आजन्म कारावास (Life imprisonment), दंडाची शिक्षा सुनावली आहे. लदळ्या आसाराम पावरा (रा. शेमोखुट, ता. झेरल्या, जि. खरगोन (मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. (Husband sentenced life imprisonment for murdering wife jalgaon crime News)

लदळ्या आसाराम पावरा यांचा विवाह मालखेडा (ता. जामनेर) येथील फुनाबाई दगडू बारेला हिच्याशी झाला होता. लदळ्या हा पत्नी फुनबाई हिच्यावर चरित्र्याचा संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करत होता. मार्च २०१८ मध्ये होळीच्या निमित्ताने फुनाबाई ही मालखेडा येथे आई जिलाबाई व वडील दगडू बारेला यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर ८ मार्च २०१८ ला लदळ्या हा पत्नीला घेण्यासाठी मालखेडा येथे आला होता. रात्री जेवण करून सर्व कुटुंबीय झोपलेले असताना लदळ्या याने हातात चाकू घेऊन पत्नी फुनाबाई हिच्यावर सपासप वार करून खून करून पसार झाला होता.

हेही वाचा: Nashik : बोराळेचा कांदा दुबईच्या बाजारात!

या प्रकरणी शेंदुर्णी दूरक्षेत्र अंतर्गत जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित म्हणून लदळ्या याला अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन संशयित आरोपीवर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायालयाचे न्या. ए. के. लाहोटी यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. यात १२ साक्षीदार तपासण्यात आले. यात मृत फुनाबाईचे आई, वडील आणि प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

हेही वाचा: Ramzan : बाशी तिवासीला स्थानिक पर्यटनाला जोर; यंत्रमागाचा खडखडाट बंद

आजन्म कारावास

संशयित आरेापी लदळ्या याच्याविरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने त्यास कलम ३०२ अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास ३ महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. नीलेश चौधरी यांनी तर पैरवी अधिकारी संजय गोसावी यांनी सहकार्य केले.

Web Title: Husband Sentenced Life Imprisonment For Murdering Wife Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top