Latest Marathi News | ग्रामपंचायत दस्तऐवजात बेकायदेशीर फेरबदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grampanchayat

Jalgaon News : ग्रामपंचायत दस्तऐवजात बेकायदेशीर फेरबदल

अमळनेर : सरपंचपदावर कार्यरत असणाऱ्या सुंदरपट्टी येथील विद्यमान सरपंच, तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी मनमानी करून ग्रामपंचायतीच्या दस्तऐवजात बेकायदेशीररित्या फेरबदल केल्याने त्यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी करून देखील कोणतीच कारवाई न झाल्याने आत्मदहन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की सुंदरपट्टी येथील विद्यमान सरपंच सुरेश अर्जुन पाटील, तत्कालीन सरपंच सुरेखा सुरेश पाटील यांनी लोकसेवक पदाचा गैरवापर करून ग्रामसेवक राधा भिकन चव्हाण यांना हाताशी धरून मिळकत धारकांना भविष्यात निवडणूक अथवा शासकीय कामात कायदेशीररित्या अडचणीत आणण्यासाठी ग्रामपंचायतीच्या नमुना क्रमांक ८ मध्ये स्वमालकीच्या असणाऱ्या मिळकतीसमोर अतिक्रमण दाखविले आहे. (Illegal alteration in Gram Panchayat document Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon Sand Mining : अवैध वाळूचे Dumpar,Tracktor जप्त

याबाबत त्यांच्यावर ग्रामपंचायत दप्तरात अफरातफर केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच ग्रामसेवक यांच्यावर प्रशासकीय कारवाई व्हावी, अशी लेखी मागणी आपल्याकडे करण्यात आली होती.

तसेच गावात २०२२ ची आदर्श आचारसंहिता लागू असल्यावर देखील विद्यमान सरपंच सुरेश पाटील हे ग्रामपंचायतीच्या कामात ढवळाढवळ करून शासकीय लेखे व दप्तर बेकायदेशीररित्या स्वतः जवळ ठेवत आहेत.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Jalgaon Road Construction : चौपदरीकरणाचे काम वर्षभरानंतरही पूर्ण होईना

वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने २५ नोव्हेंबरला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयाच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुंदरपट्टी येथील ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांना दिला आहे.निवेदनावर प्रेमराज धनराज पाटील, अर्चना प्रेमराज पाटील व नाना मुकुंदा पाटील आदींच्या सह्या आहेत.

"ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने विरोधकांचा हा स्टंट असून, जनता गेल्या १५ वर्षांपासून मला निवडून देत आहे. कुठलेही बेकायदेशीर काम झालेले नसून, कुठल्याही चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे."

- सुरेश पाटील, लोकनियुक्त सरपंच, सुंदरपट्टी

हेही वाचा: Jalgaon Crime News : स्वयंपाक Gas Cylinderही चोरट्यांच्या Targetवर