Latest Marathi News | अवैध वाळूचे Dumpar,Tracktorजप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

illegal sand transportation

Jalgaon Sand Mining : अवैध वाळूचे Dumpar,Tracktor जप्त

जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अवैध वाळूउपशाचा विषय चांगलाच तापला. यामुळे महसूल प्रशासनाने अवैध वाळूउपशाविरोधात मोहीमच उघडली आहे. प्रांताधिकार महेश सुधळकर यांच्यासह पथकाने बुधवारी (ता. २३) वाळू डंपर, तर तहसील कार्यालयाच्या पथकाने ट्रॅक्टर जप्त केले.

प्रांताधिकारी सुधळकर यांनी रात्री राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ अवैध वाळू घेऊन जाणारे डंपर (एमएच १८, व्ही १६५९) जप्त केले. बांभोरी येथील राहुल ठाकरे यांच्या मालकीचे हे डंपर आहे.

मंडलाधिकारी राजेश भंगाळे, नशिराबादचे तलाठी आशिष वाघ, तरसोदचे तलाठी आनंद खेतमाळीस यांनी ही कारवाई केली. (Illegal Sand Dumper Tractor seized Jalgaon Crime News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Jalgaon Road Construction : चौपदरीकरणाचे काम वर्षभरानंतरही पूर्ण होईना

तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी, तलाठी रवींद्र घुले यांनी बुधवारी पहाटे शहरातील प्रभात कॉलनीच्या चौफुलीवर विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त केले. राहुल सोनवणे, असे ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. प्रांताधिकारी सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आरटीओ, पोलिसांचीही कारवाई अपेक्षित

शहरासह जिल्ह्यात अवैध वाळूउपसा सुरू आहे. तो रोखणयासाठी केवळ महसूलच्या पथकाने ही कारवाई करून चालणार नाही, तर पोलिस व आरटीओ विभागानेही कारवाईसाठी पुढे आले, तरच अवैध वाळूउपशाला आळा बसेल. अनेक ट्रॅक्टर विनाक्रमांकांचे असतात. त्यावर आरटीओ विभागाने कारवाई केल्याचे आढळत नाहीत. अनेक चारचाकी वाहने क्षमतेपेक्षा अधिक वजन घेऊन वाहतूक करतात. त्यावरही आरटीओ विभाग कारवाई करीत नाहीत. अशा वाहनांवर कारवाई केली, तर अतिलोड भरून नेणाऱ्या वाहनांमुळे होणारे अपघात टळतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

लिलाव लवकर करा

जिल्ह्यात वाळूटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांना आपल्या घराची बांधकामे करता येत नसल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी अपार्टमेंटची कामे सुरू आहेत. त्याठिकाणी या-ना त्या मार्गाने वाळू येतेच. जिल्हा प्रशासनाने वाळू गटांचे लिलाव लवकर केले, तर अवैध वाळूचा विषयच मिटेल व नागरिकांना शासकीय दराने वाळू मिळेल. त्यांची रखडलेली बांधकामे सुरू होतील, अशी नागरिकांची मागणी आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime News : स्वयंपाक Gas Cylinderही चोरट्यांच्या Targetवर