Jalgaon News : अवैध वाळू वाहतूकदारांकडून मंडळ अधिकाऱ्यास मारहाण

Crime News
Crime Newsesakal

Jalgaon News : महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाकडे आणत असताना ट्रॅक्टर मालकासह दोन चालकांनी साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना काट्यात ढकलून दिले.

मंडळ अधिकाऱ्यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला असता त्यांच्या दिशेने दगडफेक केली. यात मंडळ अधिकारी जखमी झाले आहेत. मंडळ अधिकारी जगताप यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर मालकासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Illegal sand transporters Mandal officer assaulted case has been registered against both of them in Yaval police Jalgaon Crime News)

अवैध वाळू वाहतूक प्रतिबंधात्मक उपायासाठी तालुक्यातील साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यासह तलाठी मधुराज पाटील, कोतवाल विकास सोळंके हे गस्ती पथकावर असताना तालुक्यातील डांभुर्णी येथून कोळन्हावी येथील तापी नदीपात्रात जाणाऱ्या नाल्यात ट्रॅक्टर दिसल्याने पथकाने त्यास थांबवून तपासणी केली असता ट्रॅक्टरमध्ये वाळू दिसून आली.

पथकाने परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वाहतुकीचा परवाना नव्हता. ट्रॅक्टरचालकाने कोळन्हावी येथील सुपडू रमेश सोळुंके यांचे ट्रॅक्टर असल्याचे सांगितले. ट्रॅक्टरचालकाने हायड्रोलिकद्वारे वाळू खाली करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने तत्काळ शासकीय वाहनास बोलावून ट्रॅक्टर कार्यवाहीसाठी यावलकडे आणत असताना चालकाने नावरे फाट्याजवळून शिरसाड गावाकडे पळ काढला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Jalgaon News : महापालिकेतर्फे शहरवासीयांसाठी 6 बस; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम

त्याचा पाठलाग करून साकळी येथील मुस्लिम कब्रस्तानजवळ ट्रॅक्टर अडवला असता ट्रॅक्टरमालक सुपडू रमेश सोळुंके, चालक आकाश अशोक कोळी, गोपाळ प्रल्हाद सोळुंके यांनी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जगताप यांना गटारीत व काट्यात ढकलून दिले.

जगताप यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला असता त्यांच्या दिशेने दगडगोटे भिरकावले. ट्रॅक्टर मालकासह दोन चालकांनी शासकीय कामात अडथळा आणून मंडळ अधिकारी जगताप यांना मारहाण करून दुखापत केल्याच्या कारणावरून येथील पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Crime News
Jalgaon News : कपाशीला अनुदान, कांद्याला भाव द्या!; खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकाऱ्यांकडे ठिय्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com