Jalgaon News : चाळीसगावात घरपट्टी, पाणीपट्टीची केवळ 48 टक्केच करवसुली

electricity bill
electricity billsakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील नगरपालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीची करवसुली एकूण १४ कोटींपैकी ६ कोटी ७५ लाख रुपये गेल्या सोमवारपर्यंत(ता. २७) केली असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी ‘सकाळ’ला दिली. (In Chalisgaon only 48 percent of Gharpatti and Panipatti were collected jalgaon news)

मुख्याधिकारी ठोंबरे यांनी २७ सप्टेंबर २०२१ ला चाळीसगाव मुख्याधिकारीपदाच्या कारभाराची सूत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर येथील पालिकेची मुदत डिसेंबर २०२१ ला संपल्यानंतर, जानेवारी २०२२ मध्ये राज्य सरकारने मुख्याधिकारी त्यांनाच प्रशासकपदी नियुक्त केले.

पालिकेची करवसुली गेल्या सोमवारपर्यंत एकूण उद्दिष्टापैकी निम्मी सुद्धा झाली नाही,. अजून मार्च २०२३ संपण्यास अवघे चार दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना करवसुलीसाठी प्रत्येक प्रभागाचे उद्दिष्ट दिले तरच ७० ते ८० टक्के करवसुली होऊ शकते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

electricity bill
Jalgaon News : फुटीरांशी आम्ही लढायचे, तुम्ही जवळ घ्यायचे! प्रदेशाध्यक्ष पाटलांसमोर संतप्त भावना

प्रशासकपदाच्या नियुक्तीपूर्वी आतापर्यंत झालेल्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये पालिकेचे कर्मचारी प्रत्येक प्रभागामध्ये घरपट्टी व पाणीपट्टीसाठी, व्यापारी संकुलामध्ये गाळेभाडेसाठी, पालिकेच्या मालमत्ताधारकांकडे वसुलीसाठी दोन ते तीन वेळा येत असत. मात्र प्रशासकपदाच्या कारकिर्दीत तसे काही दिसत नाही. त्यामुळे जे नागरिक नियमित कर भरतात, तेच पालिकेमध्ये स्वतःहून करवसुलीसाठी येत असल्याचे दिसत आहे.

electricity bill
Jalgaon Accident News : कंटेनर टँकर अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार; लाखो रुपयांची औषधी जळून खाक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com