esakal | जळगावमध्ये महिन्याभरात तीन वेळा लसीकरण केंद्रे बंद
sakal

बोलून बातमी शोधा

जळगावमध्ये महिन्याभरात तीन वेळा लसीकरण केंद्रे बंद

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधातील लसीकरणास सुरवात झाली असली तरी आतापर्यंत नऊ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जळगावमध्ये महिन्याभरात तीन वेळा लसीकरण केंद्रे बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव: जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात तीन वेळा लसीकरण केंद्रे बंद पडली. केंद्राकडून कोरोना लशींचा पुरवठा न झाल्याचे कारण आरोग्य विभागाने दिले असले, तरी अशाच संथगतीने कोरोना लसीकरण सुरू राहिल्यास अजून दोन वर्षे तरी सर्वांना लशी देण्यास लागतील, तोपर्यंत कोरोना किती जणांचा जीव घेईल हे सांगता येत नाही, अशा खोचक प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील ३०६ गावांतील शाळांमध्‍ये वाजली घंटा

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधातील लसीकरणास सुरवात झाली असली तरी आतापर्यंत नऊ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ४४ ते ४५ लाखांपर्यंत आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरी युवकांना पुरेशा प्रमाणात लसीकरण झालेले नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत युवा पिढी अधिक बाधित झाली. आता तिसरी लाट येऊ पाहत आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे कोरोना लसीकरण होय. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले त्यांना कोरोनापासून काहीअंशी धोका नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत सक्रिय रुग्ण दहाच्या आत

महामारीची लाट आली, की ‘लॉकडाउन’ हा पर्याय होऊ शकत नाही. महामारी येणारच, त्यावर नवनवीन तंत्रज्ञानाने उपाय करणे गरजेचे आहे. कोरोनावर प्रभावी उपाय लस घेणे हा उपाय असल्याचे सर्वांना माहीत आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या वाट्याला लशींचा पुरवठा कमी करणे योग्य नाही. ज्या राज्यात भाजपची सत्ता तेथे कॉलनी-कॉलनीत कोरोना लसीकरण शिबिर अभियान राबवून प्रत्येकाला कोरोना लसीकरणाची सक्ती केली जाते. दुसरीकडे जिल्ह्यात पहाटे चारपासून लसीकरणासाठी रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात आहे. यावर जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन अन् विशेषतः पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या भावना जनमानसात आहेत.

हेही वाचा: जळगाव मनपात बंडखोर नगरसेवकांचा पून्हा भाजपला दे धक्का!

लसीकरणाची जिल्ह्याची स्थिती

पहिला डोस घेतलेले -७ लाख २ हजार ६२

दुसरा डोस घेतलेले- २ लाख २ हजार ६२३

एकूण डोस घेतलेले-९ लाख ४ हजार ८६५

loading image