esakal | जळगाव जिल्ह्यातील ३०६ गावांतील शाळांमध्‍ये वाजली घंटा
sakal

बोलून बातमी शोधा

School

जळगाव जिल्ह्यातील ३०६ गावांतील शाळांमध्‍ये वाजली घंटा

sakal_logo
By
राजेश सोनवणे


जळगाव ः शासन निर्णयानुसार जळगाव जिल्‍ह्यातील माध्‍यमिक विभागाच्‍या शाळा (Secondary Department School) सुरू झाल्‍या आहेत. ग्रामीण भागातील कोविडमुक्त (Corona Free) ७०८ गावांमधील शाळांपैकी (School) ३०६ गावांकडून शाळा सुरू करण्याबाबत ठराव प्राप्‍त होते. त्‍यानुसार आज प्रत्‍यक्षात ३०६ शाळांमध्‍ये वर्ग (Class Room) भरले होते.

( jalgaon district schools started in three hundred six villages)

हेही वाचा: दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बिबट्या पुन्हा हल्ला!शासनाने १५ जुलैपासून राज्यात आठवी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संबंधित गावांमधील ग्रामपंचायतींनी ठराव करणे आवश्यक होता. जिल्ह्यात ७०८ माध्यमिक शाळा असलेल्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन केले होते. त्यापैकी काही शाळांबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव केले असल्याने आज शाळा सुरू झाल्या.

हेही वाचा: महामार्गावरील या ढाब्यांवर नक्की जा आणि जेवणाचा आनंद घ्या

३०६ शाळांची घंटा वाजली
माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी माध्यमिक शाळांना ग्रामपंचायतींचा ठराव आवश्यक होता. जिल्ह्यातील ७०८ शाळा सुरू करण्यासाठी संबंधित शाळांना सुचना दिल्या होत्‍या. मात्र शासन निर्देशानुसार ग्रा.पं.चे ठराव घेण्यानुसार केवळ ३०६ ग्रामपंचायतींचे ठराव प्राप्‍त होते. यामुळे आज कोरोना नियमांचे पालन करत प्रत्‍यक्षात ३०६ शाळा भरल्‍या. काही शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित नव्‍हती. पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी असून, नंतर हळूहळू विद्यार्थी संख्या वाढेल असे शिक्षकांनी सांगितले.

गेटवर स्‍वागत अन्‌ शिकविणे सुरू
शाळांमध्‍ये विद्यार्थी आल्‍यानंतर कोरोना नियमांचे पालन करत प्रवेश देण्यात आला. तसेच गेटवर विद्याथ्‍र्यांचे स्‍वागत करण्यात आले. यानंतर आठवी ते दहावीच्‍या वर्गांमध्‍ये शिक्षकांनी शिकविण्यास सुरवात केली होती.

हेही वाचा: गॅज्युईटीची रक्कम जमा करण्यासाठी लाच घेणाऱ्या लिपीकाला अटक

सर्वोदय एज्युकेशन सोसायटी
आसोदा येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन उद्धवराव पाटील, अध्यक्ष विलास चौधरी , सचिव कमलाकर सावदेकर, मुख्याध्यापिका व्ही. एस.खाचणे यांनी बुधवारी बैठक घेऊन कोरोना नियम पाळत आठवी ते बारावी पर्यंत शाळा सुरू घेण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे सकाळी ८ ते ११ या दरम्यान ८वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यात आले.
तालुक्यात असोदा, नशिराबाद, कानळदा, भोकर व शिरसोली या ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात आला होता.

loading image