Jalgaon Crime News : चाळीसगाव तालुक्यात पुन्हा चालली पिस्तूल

बेलगंगा साखर कारखान्याजवळील कोंबडी फार्मवर पिस्तुलाने दोन गोळ्या झाडल्याची घटना मंगळवारी (ता.१३) पहाटेच्या सुमारास घडली.
crime
crimeesakal

Jalgaon Crime News : येथील माजी नगरसेवकावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील बेलगंगा साखर कारखान्याजवळील कोंबडी फार्मवर पिस्तुलाने दोन गोळ्या झाडल्याची घटना मंगळवारी (ता.१३) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत कोणीही जखमी झालेला नाही.

मात्र, दुसऱ्याला गोळीबाराच्या घटनेत अडकविण्यासाठी हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांना आढळून आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. (incident took place a chicken farm near Belganga Sugar Factory where two bullets were fired from pistol jalgaon crime news)

मालेगाव रस्त्यावरील बेलगंगा कारखान्याजवळील भोरस रस्त्यावरील कोंबडी फार्ममध्ये डोण दिगर (ता.चाळीसगाव) येथील संशयित आरोपी कैलास पाटील राहतो.

त्याच्यावर यापूर्वी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला जेलमध्ये जावे लागले, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी त्याने गोळीबार झाल्याचा बनाव केला.

crime
Jalgaon Crime News : चाळीसगाव गोळीबारातील दोघांना अटक

त्यासाठी त्याने दुसऱ्या आरोपीची मदत घेतली. ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून हा प्रकार गोळीबाराचा नसून संशयित कैलास पाटील यानेच दुसऱ्याच्या मदतीने गावठी पिस्तूलमधून दोन गोळ्या झाडल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी संशयित कैलासला अटक केली असून त्याचा दुसरा साथीदार फरार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

crime
Nagpur Crime: बोलत नाही म्हणून संतापला तरुण; भररस्त्यात केली तरुणीला मारहाण, पोलिसांकडून आरोपीला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com