Nagpur Crime: बोलत नाही म्हणून संतापला तरुण; भररस्त्यात केली तरुणीला मारहाण, पोलिसांकडून आरोपीला अटक

बोलत नसल्यामुळे संतापातून तरुणाने भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन केले. याप्रकरणी पीडितेने अजनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी २६ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली.
Nagpur Crime: बोलत नाही म्हणून संतापला तरुण; भररस्त्यात केली तरुणीला मारहाण, पोलिसांकडून आरोपीला अटक

Nagpur Molestation Case: बोलत नसल्यामुळे संतापातून तरुणाने भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन केले. याप्रकरणी पीडितेने अजनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी २६ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. चेतन वासुदेव घरत (२८) रा. कामनानगर, कळमना, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पीडिता आणि चेतन एकाच महाविद्यालयातून शिक्षण घेत होते. या दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. तो तिच्यावर संशय घेऊन भांडण करीत होता. त्यामुळे पीडितेने दुरावा करीत बोलणे बंद केले. यामुळे चिडलेल्या चेतनने रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पीडिता घरी जात असताना तिचा रस्ता अडवला. (Latest Marathi News)

हात पकडून गैरवर्तन केले. पीडितेने विरोध केला असता शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. लोकांची गर्दी होताना पाहून जिवे मारण्याची धमकी देत फरार झाला. पीडितेने सेामवारी घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

Nagpur Crime: बोलत नाही म्हणून संतापला तरुण; भररस्त्यात केली तरुणीला मारहाण, पोलिसांकडून आरोपीला अटक
Farmer Protest Today: शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ते का बंद केले? बॅरिकेड्सवरून पंजाब, हरियाणा हायकोर्ट संतापले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com