Jain Irrigation News : जैन इरिगेशनचे एकत्रित कर्ज 40 टक्क्यांनी घटले | Jain Irrigation consolidated debt reduced by 40 percent effect of increased profits Announced consolidated financial results for fourth quarter Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jain Irrigation Systems ltd.

Jain Irrigation News : जैन इरिगेशनचे एकत्रित कर्ज 40 टक्क्यांनी घटले

Jalgaon News : जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीने चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ ला संपलेल्या आर्थिक वर्षाचे एकल, तसेच एकत्रित निकाल नुकतेच जाहीर केले.

एकत्रित निकालात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये व्याजाच्या खर्चाची रक्कम २०० कोटी रुपयांनी कमी झाली.

नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ ला व्याजाच्या खर्चाची रक्कम एनसीडी (कर्जरोख्यांवरील) व्याजाची रक्कम रोख नसलेली वगळून ३२० कोटी रुपये राहील. ( Jain Irrigation consolidated debt reduced by 40 percent effect of increased profits Announced consolidated financial results for fourth quarter Jalgaon News)

कर्जात दोन हजार ६८३ कोटी रुपयांची घट (४१.९ टक्के) : संपूर्ण एकत्रित कर्ज ३१ मार्च २०२२ अखेर ६४०४.९ कोटी रुपये होते. ते ३१ मार्च २०२३ अखेर ३७२१.९ कोटी रुपये राहिले.

कर्जाचे कर, व्याज, कर व घसारापूर्व नफ्याशी असलेले गुणोत्तर १.७७ टक्क्यांनी सुधारले. संपूर्ण कर्जाचे कर, व्याज व घसारापूर्व नफ्याशी असलेले गुणोत्तर ६.८५ टक्के ३१ मार्च २०२२ ला होते. ते ३१ मार्च २०२३ ला ५.०८ टक्के इतके सुधारले.

एकल निकाल आढावा

२०२३ ची चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या आर्थिक वर्षात कंपनीने किरकोळ बाजारातील उत्तम मागणीमुळे उत्पन्नात भरपूर वाढ नोंदवली आणि त्यात मुख्य म्हणजे पाइप विभागास दक्षिण व पश्चिम क्षेत्राहून अधिक मागणी आणि जलजीवन मिशनच्या चौथ्या तिमाहीतील सततच्या मागण्यांमुळे वरील उत्पन्नात भरीव वाढ झाली.

चौथ्या तिमाहीत हायटेक विभागाच्या २६.६ टक्के वाढ चौथ्या तिमाहीत, तर ३१ मार्च २०२३ अखेर २३.८ टक्के वाढ कंपनीने साध्य केली.

याचे कारण म्हणजे सध्याचे प्रकल्प, किरकोळ बाजारातून खूप ऑर्डर आणि टिश्यूकल्चर व्यवसायात झालेली वाढ होय.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कंपनीच्या प्लॅस्टिक विभागाने चौथ्या तिमाहीत आणि ३१ मार्च २०२३ ला संपलेल्या आर्थिक वर्षात अनुक्रमे ५६.१ टक्के आणि ३५.९ टक्के वाढ नोंदविली. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यांत असलेल्या पीव्हीसी पाइपच्या भरपूर ऑर्डर व जलजीवन मिशनमध्येही चांगली वाढ झाली.

कंपनीने गेल्या वर्षात १८३.९ कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज फेडले, पण एनसीडीच्या ६९.३९ कोटी रुपयांच्या व्याजाची नोंद रिव्हर्स केल्यामुळे निव्वळ कर्जातील घट ९२.० कोटी रुपये राहिली.

ऑर्डर्स बुक

सध्या कंपनीच्या ऑर्डर पुस्तकामध्ये १३२७.८ कोटी रुपयांच्या संपूर्ण ऑर्डर हातात आहेत. त्यापैकी हायटेक ॲग्री इनपुट विभागाच्या ५९२.४ कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत व ७३५.४ कोटी रुपयांच्या प्लॅस्टिक विभागाच्याही ऑर्डर आहेत.

एकत्रित निकाल

कंपनीच्या सर्व व्यवसायांत नोंदवलेली उत्पन्नात वाढ ही भारतात सगळ्या विभागांत झाली आहे. कंपनीच्या उत्पन्नातील वाढ ही प्लॅस्टिक आणि अन्नप्रक्रिया विभागात नफ्याच्या मार्जिनमध्ये सुधारणा झाल्यामुळे कंपनीच्या कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात (इबीआयडीटीए) सुधारणा झाल्यामुळे कंपनीने साध्य केली.

चौथ्या तिमाहीत हायटेक विभागाने सध्या सुरू असलेल्या प्रकल्पाचे पूर्ण झालेले काम, उत्पादनांना किरकोळ बाजारातील जास्त मागणी आणि भारतातील कंपनीचा टिश्यूकल्चर विभागातही जास्त मागणी आहे.

यामुळेच हायटेक विभागात भरपूर वाढ शक्य झाली. भारतातील निर्जलीकृत कांद्याच्या चांगल्या ऑर्डर असल्यामुळे ॲग्रो विभागाची चांगली वाढ झाली. कंपनीच्या फळभाजीपाला प्रक्रियात भारतात आणि जगातही चांगली वाढ कंपनीने नोंदवली.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये विलीनीकरण केलेल्या (Discontinned) विभागातून मिळालेले उत्पन्न २२३२.१ कोटी रुपये (आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २३८६.१ कोटी रुपये) आणि कर, व्याज व घसारापूर्व नफा (इबीआयडीटीए) २१६.२ कोटी रुपये, ९.७ टक्के (आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३८३.६ कोटी रुपये, १६.१ टक्के)

"कंपनीने सर्व व्यवसायांत उत्पन्नात भरपूर वाढ नोंदविली आहे व नफाही अपेक्षेनुसार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनी आपली जोरदार वाढ सुरू ठेवेल, अशी आमची आशा आहे."

-अनिल जैन, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड

टॅग्स :JalgaonResultProfitloans