Jalgaon Unseasonal Rain Damage : जिल्ह्यात अवकाळी, गारपिटीने 18 हजार हेक्टर क्षेत्र बाधित

Jalgaon Unseasonal Rain Damage : शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता. २६) रात्री काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारांचा अवकाळी पाऊस झाला.
Jalgaon Unseasonal Rain Crop Damage (file photo)
Jalgaon Unseasonal Rain Crop Damage (file photo)esakal

Jalgaon Unseasonal Rain Damage : शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता. २६) रात्री काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारांचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे १८ हजार ८७५.५१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात गहू, ज्वारी, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण २१५ गावांमधील २१ हजार ६७ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला.

कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. (Jalgaon 18 thousand hectare area affected by bad weather hailstorm in district)

Jalgaon Unseasonal Rain Crop Damage (file photo)
Jalgaon Unseasonal rain Damage : मेहुणबारे परिसरात अवकाळीचा कहर; गारपिटीमुळे केळी, कांद्याचे पीक जमीनदोस्त

पारोळा, चाळीसगाव, धरणगाव, चोपडा, अमळनेर या तालुक्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला. सोमवारी रात्री झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पारोळा तालुक्यातील झालेल्या शेतीच्या नुकसानीची उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी विविध प्रक्षेत्रांत भेटी देऊन पाहणी केली. मौजे मोंढळे (ता. पारोळा) येथे गारपीट होऊन शेती पिकाचे नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय झालेले नुकसान असे ः

तालुका--हेक्टर

चाळीसगाव ३५९३

भडगाव ९२३१

अमळनेर ३३९०

पारोळा ६३७५

धरणगाव १३५

चोपडा ४९९०.२०

Jalgaon Unseasonal Rain Crop Damage (file photo)
Jalgaon Unseasonal rain Damage : नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com