Jalgaon News : दोंदवाडेत 2 चिमुरड्यांचा तापीच्या पात्रात बुडून मृत्यू

Jalgaon : खेळत खेळत तापी नदीच्या पात्रात गेलेल्या दोंदवाडे येथील दोन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली.
Youth Drowned
Youth DrownedSakal

चोपडा : खेळत खेळत तापी नदीच्या पात्रात गेलेल्या दोंदवाडे येथील दोन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. या बालकांमध्ये एक सहावर्षीय मुलगी व एक सातवर्षीय मुलाचा समावेश आहे. मनीषा परशुराम कोटे (पावरा, ६) व बाजीगर गाठीराम पावरा (७) अशी मृत मुलांची नावे आहेत. या बालकांचे वडील दोंदवाडे गावात सालदारकी करतात. तापीचे पात्र गावाला लागूनच आहे. ही बालके दुपारी नदीपात्राजवळच खेळत होती. (Jalgaon 2 children drowned in tapi vessel in Dondwada marathi news)

सोमवारी सायंकाळी ही दोन्ही बालके दिसत नसल्याने गावात शोधाशोध सुरू झाली. मात्र ते गावात कुठेही आढळून आली नाहीत म्हणून ग्रामस्थांनी तापी नदीकडे धाव घेतली. चार, पाच दिवसांपूर्वी गूळ मध्यम प्रकल्पातून तापी नदीत पाणी सोडले गेल्याने नदीला पाणी होते.

या पाण्यात दोन्ही बालके सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बुडालेल्या अवस्थेत गावकऱ्यांना मिळून आले. सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील, पोलिसपाटील नितीन पाटील, तुळशीराम कोळी, प्रेमसिंग पावरा.

Youth Drowned
Jalgaon Crime News : बहीण, प्रियकराला ठार मारणाऱ्या 5 जणांना जन्मठेप!

गौरव पाटील, स्वप्नील पाटील, प्रमोद पाटील, भास्कर पाटील, अविनाश पाटील यांनी दोन्ही बालकांना तापी नदीतून काढत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले होते.

डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मंगळवारी (ता. २) शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Youth Drowned
Jalgaon News : फळ विक्रीतून 35 ते 40 तरुण झाले आत्मनिर्भर! पारोळ्यात बेरोजगारीवर मात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com