Jalgaon News : मराठीच्या पेपरला 70 विद्यार्थी गैरहजर

Jalgaon : तालुक्यात ३ हजार १०४ विद्यार्थ्यांनी ११ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा दिली. अकरा बैठे पथक आणि एक फिरते पथक असे १२ पथक परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नेमण्यात आले होते.
Exam (file photo)
Exam (file photo)esakal

Jalgaon News : तालुक्यात ३ हजार १०४ विद्यार्थ्यांनी ११ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा दिली. अकरा बैठे पथक आणि एक फिरते पथक असे १२ पथक परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नेमण्यात आले होते. शुक्रवारी (ता. एक) मराठी भाषेचा पेपर होता. तीन हजार १७४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.

Exam (file photo)
Jalgaon Polio Vaccination : जिल्ह्यात 4 लाख बालकांना मिळणार ‘पोलिओ’ ची मात्रा

त्यात सात विद्यार्थी दिव्यांग होते. त्यांना लेखक आणि जादा वेळ देण्यात आला होता. ७० विद्यार्थी गैरहजर होते. उर्दू माध्यमाचे १८२ विद्यार्थी प्रविष्ट होते. १ विद्यार्थी गैरहजर होता. परीक्षा केंद्रांवर सकाळी दहापासूनच बैठे पथक नियुक्त करण्यात आले असल्याने परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती.

मुलींची तपासणी महिला शिक्षकांकडून केली जात होती. ग्रामीण भागात काही परीक्षा केंद्रांवर कंपाऊंड नसल्याने किंवा तुटलेले असल्याने पालक व लहान विद्यार्थी तसेच टारगट मुले गोंधळ घालत होते. (latest marathi news)

Exam (file photo)
Jalgaon Unseasonal Rain Damage : मेहुणबारे परिसरात शुक्रवारी पुन्हा नुकसानीचा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com