Jalgaon Accident News : चारचाकी वाहनाची रिक्षाला धडक; 5 प्रवासी जखमी

Jalgaon Accident : पहूर येथून भरधाव वेगाने येत असलेल्या चारचाकी वाहनाने पॅगो प्रवासी रिक्षाला धडक दिल्याने रिक्षामधील एकजण जागीच ठार झाला असून, ५ प्रवासी जखमी झाले आहेत.
Accident
Accident esakal

Jalgaon Accident News : पहूर येथून भरधाव वेगाने येत असलेल्या चारचाकी वाहनाने पॅगो प्रवासी रिक्षाला धडक दिल्याने रिक्षामधील एकजण जागीच ठार झाला असून, ५ प्रवासी जखमी झाले आहेत. मृत व जखमी टाकळी खुर्द (ता. जामनेर) येथील रहिवासी आहे. जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. अपघात जामनेर टाकळी दरम्यान एका हॉटेलसमोर मंगळवारी (ता. १९) मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. (Jalgaon Accident four wheeler collided with rickshaw 5 passengers injured)

रवींद्र आनंदा बावस्कर (वय ३०) असे मृताचे नाव असून, सुनील मुरलीधर सातव (वय ३०), रिक्षा चालक रामेश्वर बाजीराव मोरे (२४), अनिल मुरलीधर सातव (२३), अजय किरण चौरे (२०) व जीवन विकास अहिरे (२१) जखमींची नावे आहे.

टाकळी खुर्द येथील तरुण गाडेगाव येथील सुप्रिम कंपनीत काम करीत असून, ते रात्रीची शिफ्ट आटोपून रिक्षाने (क्रमांक एमएच १९, बीजे १६९४) गावाकडे येत असताना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या होंडा अमेझ कारने (एमएच १९, सीव्ही ००३७) धडक दिली.

Accident
Nagpur Accident News : विचित्र अपघातात पाच वाहनांना धडक; अजनी चौकातील अपघात पाच जण गंभीर जखमी

ग्रामस्थांनी तातडीने जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविले. राजू देवचंद बावस्कर (रा. टाकळी खुर्द, ता. जामनेर) यांचे फिर्यादीवरून कारचालक सुमित नारायण पाटील (रा. आमखेडा, ता.जामनेर) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे तपास करीत आहेत.

Accident
Pune Crime News : आर्थिक फसवणुकीचे सायबर चोरट्यांना ‘क्रेडिट’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com