Jalgaon Accident News : विचखेड्याजवळ कार- गॅस टँकरची धडक; पालिका अभियंत्यासह डॉक्टर ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Jalgaon Accident News : विचखेड्याजवळ कार- गॅस टँकरची धडक; पालिका अभियंत्यासह डॉक्टर ठार

पारोळा : मुंबईहून पारोळा येथे येत असताना अवघ्या तीन किलोमीटर अंतर असलेल्या विचखेड्याजवळ सोमवारी (ता. २६) सकाळी साडेसहाच्या सुमारास गॅस टँकर व कार यांच्यात अपघात होऊन त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांत डॉक्टरसह पालिका अभियंत्याचा समावेश आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

हेही वाचा: Jalgaon News : चाळीसगावला झालेल्या चोरीत नातजावई निघाला Mastermind

मुंबईहून पारोळा येथे येत असताना विचखेडे गावानजीक महामार्गावर सोमवारी (ता. २६) सकाळी साडेसहाच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणारे गॅस टॅंकरने कारला जोरदार धडक दिली. यात पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल देविदास सौपुरे (वय ३३, रा. गोंधळवाडा, पारोळा) व एम. एस. अर्थो स्पेशालिस्ट डॉ. नीलेश भीमराव मंगळे (वय ३४, रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप आनंदा पवार (वय ३५, रा. आर. एल. नगर, पारोळा) हे जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा: Accident News : अकरा महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १८५ अपघात

या वेळी पारोळा पोलिसात सुनील बारी यांनी पारोळा पोलिसात दिलेल्या माहितीनुसार महामार्गावरील विचखेडे गावाजवळ मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (एमएच ४३, एएल ४१७५) ही धुळ्याकडून पारोळ्याकडे येत असताना समोरून पारोळाकडून धुळ्याकडे जाणारा गॅस कंटेनर (एमएच ३१, एफसी ४३९३) याच्यावरील चालकाने भरधाव वेगाने आपले वाहन चालवून कारला समोरून जोरदार धडक दिली. यात कारमधील कुणाल सौपुरे, डॉ. नीलेश मंगळे यांना जबर दुखापत झाल्याने

त्यांचा जागीच मृत्यू झाला तर संदीप पवार जखमी झाले आहे.

दरम्यान, पारोळा पोलिसात गॅस कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस करीत आहेत. कुणाल सौपुरे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, व दोन वर्षांची लहान मुलगी आहे. पारोळा नगरपालिकेत अभियंता असल्याने सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव होता. डॉ. नीलेश मंगळे हे उत्तराखंड येथे एमएस अर्थो स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, पत्नी व दोन महिन्याचे जुळी दोन मुले आहेत. बालपणापासूनच अभ्यासाची गोडी असल्याने ते हुशार होते, संदीप पवार हे जखमी झाले आहेत

हेही वाचा: Jaykumar Gore accident : या पूर्वी झालेल्या नेत्यांचे भीषण अपघात; क्षणात संपलं सारं

दरम्यान, शनिवार, रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना काळाने घाला घातला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.

कुणाल सौपुरे हे मूळचे नंदुरबारचे असल्याने त्यांच्यावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तर डॉ. नीलेश मंगळे यांच्यावर पारोळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी परतीचा प्रवास शहरापासून काही अंतरावर असताना टँकर व कारचा झालेल्या अपघातामुळे शहरासह पारोळा पालिकेत शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime News : चक्क! विवाहितेला अविवाहित दाखवून लावला विवाह!