Jalgaon Accident News : मशिनच्या पट्ट्यात स्कार्फ अडकून महिलेचे शीर धडावेगळे; 3 लेकरांचे मातृछत्र हरपले

Jalgaon Accident : औद्योगीक वसाहत परिसरातील व्ही-सेक्टरमधे मुकेश ॲग्रो या दालमिलमध्ये पती-पत्नी सोबत काम करत होते.
Saraswati Thackeray
Saraswati Thackerayesakal

Jalgaon Accident News : औद्योगीक वसाहत परिसरातील व्ही-सेक्टरमधे मुकेश ॲग्रो या दालमिलमध्ये पती-पत्नी सोबत काम करत होते. पतीने मशिन सुरु केले तर, पत्नी वर चढून मशिनसाठी लागणारे पाणी व पावडर सोडत असताना तिच्या गळ्यातील स्कार्फ मशिनच्या पट्ट्यात अडकून काही कळण्याच्या आतच महिलेचे शीर धडावेगळे झाले. जोरदार आवाज झाल्याने पती बघण्यासाठी गेला तर समोरचे चित्र बघताच तो सुन्न झाला. सरस्वती गोविंद ठाकरे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. (Jalgaon Accident woman killed after her scarf got stuck in belt of machine)

सरस्वती गोविंद ठाकरे ही महिला पती गोविंद नानू ठाकरे याच्यासह मुकेश ॲग्रो इंडस्ट्रीज आवारातच वास्तव्यास असून, पती-पत्नीसोबत दालमिलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून काम करत होते. मंगळवारी (ता.१२) नेहमीप्रमाणे दुपारी २ वाजता जेवण आटोपून दोघे कामाला लागले. पती गोविंद याने पत्नी सरस्वतीला वर जाऊन दालमील यंत्रासाठी आवश्यक आद्रतेनुसार थोडे पाणी व पावडर टाकण्यास सांगितले व लगेच मशिन सुरु केले.

मशिनजवळ सरस्वती पोहचताच जोरदार आवाज होऊन गोविंद वर धावत सुटला. समोरचे दृश्‍य पाहून तो नि:शब्द होऊन जमिनीवर कोसळला. दुर्घटनेत सरस्वतीचे धड एकीकडे तर, मुंडके दुसऱ्या बाजूला पडले होते.

गळ्यातील स्कार्फने केला घात

सरस्वती मशिनमध्ये डाळ टाकत असताना त्यांच्या गळ्यात बांधलेला स्कार्फ हा मशिनच्या पट्ट्यात ओढला गेला. तीन हॉर्सपावरच्या मशिनच्या अतिवेगवान फिरणाऱ्या पट्ट्यात गळ्यातील स्कार्फसह सरस्वती ओढली जाऊन तिचे शीर धडावेगळे होऊन फुटबॉलसारखे फेकले गेले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.(latest marathi news)

Saraswati Thackeray
Pune ST Accident : : पुण्यात एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटले; महिलेला धडक

कामगारांची धावपळ

घडल्या प्रकाराने दालमिल मधील इतर कामगारांनी धाव घेतली. तर, महिला मजुरांना समोरचे चित्र पाहण्यापासून रोखण्यात आले होते. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, हवालदार ललित नारखेडे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला केला. दालमील बंद करून मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना केला.

तिन्ही लेकरं अनाथ

सरस्वती हिचे दुसरे लग्न असून, पहिला पती वीरेंद्रसिंह मौर्य यांच्यापासून मुलगी परी (वय १४) आणि मुलगा गुड्डू (१६) असे दोन अपत्य आहे. दुसरा पती गोविंद ठाकरे याच्यापासून विष्णू (५) असे तीन अपत्य असून, आईचा मृत्यू झाल्याने तिन्ही लेकरं धायमोकलून रडत होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चूक कुणाची..

घडलेल्या घटनेत सरस्वती ठाकरे या महिलेच्या गळ्यातील स्कार्फ मशिनमध्ये ओढला गेल्याचे सांगितले जात असून, तिचा पती मशिन ऑपरेटर आहे. या दालमीलमधील मॅनेजर, टेक्निशियन, कंत्राटदार असे कुणीही घटना घडली त्यावेळेस उपस्थित नव्हते. परिणामी, सुरक्षा उपकरणाशिवायच कामगार येथे काम करत होते. कंपनीकडे विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Saraswati Thackeray
Nashik Crime News : ATM फोडण्याचा प्रयत्न असफल; सिक्युरिटी गार्डला मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com