जळगाव : ‘अलार्म’ मिळताच आग विझविणारी यंत्रणा

साडेसहा कोटींची तरतूद; ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात होणार कार्यान्वित
Jalgaon Fire
Jalgaon Fire sakal

जळगाव : जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये(District Sub-District Hospital), ग्रामीण रुग्णालयात फायर ऑडिटची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. त्याअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग आता अशी यंत्रणा कार्यान्वित करेल, की संबंधित रुग्णालयांमध्ये थोडासाही धूर निघाला किंवा जाळ लागल्याचे दिसल्यास संबंधित यंत्रणा अर्लाम तर वाजवेल, सोबतच त्याठिकाणी लागलीच पाणीही टाकेल. जेणे करून आग मोठे स्वरूप धारण करणार नाही. काही मिनिटांत रुग्णालयातील यंत्रणा अग्निशामक बंबांना बोलावून आग विझवेल. अशी ही अत्याधुनिक यंत्रणा बसविली जात आहे. त्या अनुषंगाने संभाव्य आगीची ठिकाणी शोधण्याचे काम सध्या बांधकाम विभाग करीत आहे.

Jalgaon Fire
लॉकडाऊनमध्ये विजेच्या निर्मितीसाठी राज्यावर २ हजार कोटींचे कर्ज

नाशिक, मुंबई, नगर येथे जिल्हा रुग्णालयात आगीच्या घटना मागे घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती इतर जिल्हा रुग्णालयात होऊ नये यासाठी राज्य शासनाने सर्वच शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात फायर ऑडीटची कामे झाले. त्यासाठी साडेसहा कोटींचा खर्चही बांधकाम विभागाने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे, त्यांनी शासनाकडे सादर केला आहे. नुकतीच या खर्चाला मंजुरी मिळाली आहे.

Jalgaon Fire
UP elections : निवडणूक आयोगाची कारवाई, पोलीस निरीक्षक निलंबित

फायर ऑडिटमध्ये संभाव्य आगीची ठिकाणी शोधण्यात आली आहेत. तेथे कशामुळे आग लागू शकते याची कारणेही देऊन त्याबाबत उपाय योजना करण्यात आल्या आहेत. रेकॉर्ड रूम, फायर लिकीजेसची ठिकाणी, आगीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बाबी जशा उघड्या वायरी, कनेक्शन काढून त्याला सिलपॅक न करता तसेच सोडून दिलेल्या कनेक्शन आदी बाबींचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना सुचविल्या आहेत. बांधकाम विभागाने आता अत्याधुनिक प्रकारे ‘स्मोक अर्लाम’, ‘फायर अलार्म’ लावण्याचे नियोजन केले आहे. याद्वारे रुग्णालयामध्ये कोणत्याही ठिकाणी जराही धूर दिसत असल्यास लागलीच अर्लाम वाजेल. तेथीलच यंत्रणा ऑटोमेटीकरित्या काही वेळ स्वतःच आगीच्या ठिकाणी फायर कंट्रोल करेल. पाण्याची गरज पडली तर पाणीही टाकेल. यामुळे आगीचे स्वरूप मोठे न होता नियंत्रणात राहील. तोपर्यंत रुग्णालयातील संबंधित अलर्ट होवून आग विझविण्यासाठी बंब बोलावतील. आणि आग नियंत्रणात येईल.

Jalgaon Fire
पुण्यात नवे निर्बंध? रुग्ण वाढल्यानंतर अजित पवारांची तातडीची बैठक

उपमुख्यमंत्र्यांनी विचारला होता प्रश्‍न ?

जिल्ह्यातील फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिटबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ डिसेंबर २०२१ ला झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्‍न विचारला होता. त्यावेळी केवळ ऑडिट करता म्हणून करू नका, आगीच्या घटना घडू नयेत यासाठी नवीन काही करण्याचा सल्ला दिला होता. सोबतच ऑडिटची बिले काढून रुग्णालयातील फायर बाबींची वर्षभर देखरेख करण्याचे सांगितले हेाते.

'जिल्हा उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक प्रकारची फायर कंट्रोल सिस्टीम बांधकाम विभाग बसवीत आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट अंतिम टप्प्यात आले आहे. ही यंत्रणा बसविण्याने आग लागलीच आटोक्यात आणण्यात यश येईल.'

-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com