Amit Shah Jalgaon Daura : अमित शहांचा मंगळवारी जळगाव दौरा; 25 हजार तरुणांशी साधणार संवाद

Amit Shah Jalgaon Daura : अमित शहा जळगाव जिल्ह्यात प्रथमच येत असून त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरु आहे.
Officials and activists present at the meeting held at the BJP office on the occasion of BJP leader Amit Shah's meeting on Tuesday.
Officials and activists present at the meeting held at the BJP office on the occasion of BJP leader Amit Shah's meeting on Tuesday.esakal

Amit Shah Jalgaon Daura : शहरातील सागर पार्क मैदानावर येत्या ५ मार्चला होणाऱ्या युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जळगावात येत असून त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपतर्फे खानदेशसह उत्तर महाराष्ट्रातून या युवा संमेलनास २५ हजारांवर तरुण हजर राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

अमित शहा जळगाव जिल्ह्यात प्रथमच येत असून त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरु आहे. (Amit Shah visit to Jalgaon on tomorrow)

त्याच पार्श्वभूमीवर पूर्व नियोजन व युवा चौपाल कार्यक्रमांसंबंधी भाजप युवा मोर्चा जिल्हा महानगरची बैठक शनिवारी भाजपच्या ‘वसंतस्मृती’ या जिल्हा कार्यालयात झाली. बैठकीला महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, सरचिटणीस महेश जोशी, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, विकास सोनार.

सागर जाधव, मयूर कापसे, गजानन वंजारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी युवा संवाद कार्यक्रमासाठी सागर पार्क कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणाऱ्या हजारो युवकांची गैरसोय होऊ नये म्हणून पूर्वनियोजनात उपाययोजना करता येतील, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. (latest marathi news)

Officials and activists present at the meeting held at the BJP office on the occasion of BJP leader Amit Shah's meeting on Tuesday.
Jalgaon News : निंभोरात 40 दिवसांपासून वीज गायब; वीज वितरण विभागाची अशीही चालढकल

उज्वला बेंडाळे यांनी युवा संवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपापली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याची सूचना केली. जळगाव जिल्ह्यातील युवकांनी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी केले आहे. बैठकीचे सूत्रसंचालन अक्षय जेजुरकर यांनी केले तर सागर जाधव यांनी आभार मानले.

‘क्लस्टर’चे संमेलन

देशभरात विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपतर्फे ‘क्लस्टर’ बैठका, संमेलन होणार आहे. त्याचाच भाग म्हणून जळगाव, रावेर, धुळे व नंदूरबार अशा चार लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टर बैठकीचे या संमेलनाचे स्वरूप आहे. चारही मतदारसंघांतून युवक संमेलनास हजर राहतील. मुख्यत्वे जळगाव व रावेर मतदारसंघांतील तरुणांच्या उपस्थितीवर भर राहणार आहे. मंत्री गिरीश महाजन या क्लस्टरचे प्रमुख आहेत.

Officials and activists present at the meeting held at the BJP office on the occasion of BJP leader Amit Shah's meeting on Tuesday.
CM Shinde Jalgaon Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com