Jalgaon News : शासकीय नर्सींगच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांर्गत चालविल्या जाणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयात पहिल्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींने गळफास घेऊन आत्महत्या केली.
dead
dead esakal

Jalgaon News : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांर्गत चालविल्या जाणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयात पहिल्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. ७) सायंकाळी उघडकीस आली. करूणा संतोष बोदडे (वय २२, रा. वाडोदा ता. यावल, ह.मु. दीक्षितवाडी, जळगाव) असे मृत विद्यार्थिनींचे नाव आहे. (Jalgaon An extreme step taken by a government nursing student)

दीक्षितवाडीत मैत्रिणींसह खोली घेऊन वास्तव्यास असलेल्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. करूणा बोदडे हिच्या सर्व मैत्रिणी गावाला गेल्या होत्या. रविवारी (ता. ७) करूणा खोलीत एकटीच असताना, सायंकाळी तिने छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची एक मैत्रिण सायंकाळी पाचला खोलीवर आली.

खोलीचे दार आतून बंद होते. बराच वेळ तिने दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद मिळत नाही, म्हणून मागच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता, करूणा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

dead
Nagpur Accident: भरधाव ट्रकने १२ वाहनांना चिरडलं; कार, दुचाकी अन् रूग्णवाहिकेचा चक्काचूर, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

याबाबत घरमालकांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून करुणाला मृत घोषीत केले.

मत मुलीच्या कुटुंबीयांना घटना कळविली असून, रात्री उशिरापर्यंत तिचे कुटुंब जळगावला पोचणार असल्याचे सांगण्यात आले. करुणाने आत्महत्या का केली, याचे कारण पोलिस तपासात समोर येणार आहे.

dead
Accident News: संभाजीनगर-जळगाव महामार्गावरती भीषण अपघात; वाहतुकीवर परिणाम, १० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com