‘राइज’अंतर्गत ‘उमवि’तील २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University

जळगाव : ‘राइज’अंतर्गत ‘उमवि’तील २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University) संगणकशास्त्र प्रशाळेचे माजी विद्यार्थी निलेश पाटील यांच्या पुढाकाराने गोपाल पाटील, राजेश्वर नेरे, लक्ष्मीकांत जाधव आणि प्रफुल्ल काळे यांनी संगणकशास्त्र प्रशाळेसोबत सामंजस्य करार केला आहे.

हेही वाचा: शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एसटी संपाबाबत कृती समितीची बैठक

या करारांतर्गत ‘राईज’ या नावाने शिष्यवृत्ती सुरू केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षात २० विद्यार्थ्यांना एकूण अडीच लाख रूपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.

संगणशास्त्र प्रशाळेत कॉम्प्युटर सायन्सेस विषयात पदव्युत्तर शिक्षणाचे तीन वेगवेगळे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांचे वार्षिक शुल्क साधारणत: २० हजार रूपये पर्यंतचे असून या शुल्कासह परीक्षा शुल्क, वसतिगृह शुल्क आणि इतर शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागतात. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना हे शुल्क भरण्यास अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागते. गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने संगणशास्त्र प्रशाळेतील माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला.

हेही वाचा: PM मोदींच्या सुरक्षेत चूक कोणामुळे? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

या करारांतर्गत दरवर्षी संगणकशास्त्र प्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या गरजू गुणवंत व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासह, वसतिगृह शुल्क व अभ्यासक्रमासाठी लागणारे इतर शुल्क देण्यात येते. संगणकशास्त्र विभागातील या माजी विद्यार्थ्यांनी ‘राईज’ शिष्यवृत्ती सुरू केली. हा उपक्रम प्रशंसनीय व अनुकरणीय असल्याचे मत व्यक्त करत प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

'आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण सोडावे लागू नये यासाठीच आम्ही ही मदत करत आहोत. त्याचा गरजू विद्यार्थ्यांना लाभ होईल, असा विश्‍वास आहे.'

- नीलेश पाटील

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top