Coconut Water : नारळपाणी उन्हाळ्यात उत्तम एनर्जी बूस्टर; रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत

Jalgaon News : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी नारळपाणी पिणे हा सर्वांत चांगला पर्याय आहे. नारळपाणी एक उत्तम एनर्जी बूस्टर आहे.
Coconut Water
Coconut Wateresakal

Jalgaon News : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी नारळपाणी पिणे हा सर्वांत चांगला पर्याय आहे. नारळपाणी एक उत्तम एनर्जी बूस्टर आहे. त्याचे नियमित प्राशन केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. किडनीचे विकार दूर होण्यासही ते सहाय्यक असून, त्यामुळे त्वचाही चमकदार होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. नारळपाणी इलेक्ट्रोलाइट्स आणि पोषक तत्त्वांचा नैसर्गिक स्रोत आहे. (Jalgaon Coconut water is a great energy booster in summer)

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे पोषक तत्त्वांचे भांडार म्हणजे नारळपाणी असे तज्ज्ञ सांगत आहेत. रक्तदाब, शुगर नियंत्रणात राहते किडनीचे आरोग्य चांगले राहते. शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच त्वचेसाठी फायदेशीर ठरत असल्याचे, तज्ज्ञ सांगतात.

"नारळपाण्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे मधुमेहींनी मोठ्या प्रमाणात नारळ खाऊ नये. पाणीदेखील अधिक प्रमाणात पिऊ नये. मात्र, ठरावीक प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते. इतरांनी मात्र, आवर्जून नारळ पाण्याचा उपयोग करावा. यात मिनरल जास्त असल्याने शरीरासाठी त्याचा चांगला उपयोग होतो, तसेच व्हायरल इन्फेक्शन असले तरी देखील नारळ पाणी एनर्जी वाढविण्यासाठी मदत करते." - डिंपल कोळी, आहारतज्ज्ञ (latest marathi news)

Coconut Water
Jalgaon Lok Sabha Election : निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश जोरात; शिंदे गटाच्या अस्मिता पाटील शिवसेना ठाकरे गटात

'नारळपाणी' पोषक तत्त्वांचे भांडार

कडक उन्हाचा पारा वाढत असताना उन्हाळ्यात नारळपाणी उत्तम एनर्जी बूस्टर ठरत आहे. इतर केमिकलयुक्त पेय पिण्यापेक्षा २० ते ५० रुपये प्रती नग नारळपाणी मिळतो. विशेष म्हणजे आरोग्यास देखील उत्तम आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे पोषक तत्त्वांचे भांडार म्हणजे नारळपाणी असे तज्ज्ञ सांगतात.

Coconut Water
Jalgaon Agriculture News : ज्वारी उत्पादकांना साडे तिनशे कोटीहून अधिक दणका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com