Jalgaon Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादीच्या घरावर हल्ला

Jalgaon Crime : शहरातील तुकारामवाडीत जुन्या वादातून गुंडाच्या टोळक्याने खुनाच्या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि मुळ फिर्यादीच्या घरावर हल्ला चढविला.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime : शहरातील तुकारामवाडीत जुन्या वादातून गुंडाच्या टोळक्याने खुनाच्या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि मुळ फिर्यादीच्या घरावर हल्ला चढविला. खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांकडून घरावर दगडफेकीसह घरात घुसून सामानाची तोडफोड करण्यात आली. इतक्यावरच न थांबता गल्लीत उभ्या दुचाकींचेही नुकसान करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. (Jalgaon Crime Attack on house of murder accused)

तुकारामवाडीतील हनुमान मंदिराजवळ अरुण भीमराव गोसावी कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. साधारण दोन वर्षांपूर्वी धुलिवंदनाच्या दिवशी झालेल्या वादातून २२ मार्च २०२२ ला अरुण गोसावी आणि सुरेश विजय ओतारी यांच्यावर जिल्‍हा रुग्णालयात सशस्त्र हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात सुरेश ओतारी याचा मृत्यू झाला. याबाबत गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. ५ संशयितांना अटक करण्यात आली होती.

घरावर सशस्त्र हल्ला

शनिवारी (ता. ६) रात्री पावणेबाराच्या सुमारास भूषण माळी ऊर्फ भाचा, आकाश ठाकूर ऊर्फ खंड्या, पवन बाविस्कर ऊर्फ बद्या, सचिन चौधरी ऊर्फ टिचकुल्या, आकाश मराठे ऊर्फ ब्रो, चेतन सुशीर ऊर्फ बटाट्या यांनी अरुण गोसावी यांच्या घरावर हातात कोयता आणि लाठ्याकाठ्या घेत हल्ला चढवला.

Crime
Dhule Crime News : मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा; राष्ट्रीय चर्मकार महासंघ

घरावर बेछुट दगडफेक करत शिवीगाळ आणि दहशत निर्माण केली. घराचा मुख्य दरवाजा तोडून घरातील सामानाची तोडफोड केली. भूषण माळी याने ‘तू कसा आमच्याविरुद्ध केस चालवतो, तुला बघतोच, आज तुझाच मर्डर करतो’, अशी धमकी दिली.

थोडक्यात जीव वाचला

अरुण गोसावी यांनी प्रसंगावधान राखत घराच्या मागील दरवाजाने आपला जीव वाचवत पळ काढला. याप्रकरणी अरुण गोसावी यांनी रविवारी (ता. ७) दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात भूषण माळी, आकाश ठाकूर, पवन बाविस्कर, सचिन चौधरी, आकाश मराठे, चेतन सुशिर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र वाघमारे तपास करीत आहेत.

गल्लीतील वाहनांचे नुकसान

रात्री दोन ते तीनच्या सुमारास तुकारामवाडीतील १५ ते २० दुचाकींची तोडफोड करून नुकसान करण्यात आले आहे. तोडफोडीचा प्रकार याच गुन्ह्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. घडलेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले असून, तपास सुरू आहे.

Crime
Nashik Bribe Crime : मालेगावी अव्वल कारकुनाला 22 हजार लाच घेताना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com