Jalgaon Crime News : सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच दानपेटी चोरणाऱ्याचा लागला छडा

Jalgaon Crime : गुजराथी गल्ली भागातील सार्वजनिक गणपती मंदिरात रविवारी (ता. १७) दुपारी एका सोळा वर्षीय मुलाने प्रवेश करून दर्शनाच्या बहाण्याने गाभाऱ्यातील दानपेटी चोरी केली.
Crime
Crimeesakal

Jalgaon Crime News : येथील गुजराथी गल्ली भागातील सार्वजनिक गणपती मंदिरात रविवारी (ता. १७) दुपारी एका सोळा वर्षीय मुलाने प्रवेश करून दर्शनाच्या बहाण्याने गाभाऱ्यातील दानपेटी चोरी केली. दरम्यान, पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’चे फुटेज वॉट्स ॲप ग्रुपवर व्हायरल केल्याने अवघ्या काही तासांत चोरीचा छडा लागला. या प्रकरणी संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. (Jalgaon Crime CCTV footage went viral thief of donation box was caught)

चोरीची घटना मंदिर परिसरातील ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाली होती. दरम्यान, मंदिराचे विश्वस्त पंकज गुजराथी, मिलिंद नावरकर, नीरज गुजराथी, राहुल नांदेडकर आदींनी हे फुटेज तपासून एका वॉट्स ॲप ग्रुपवर टाकले.

या बाबत आरोपीचा चेहरा, पाठीमागे असलेली बॅग,वेशभूषा ही स्पष्ट दिसत असल्याने सोमवारी (ता. १८) हा संशयित एका महाविद्यालय परिसरात फिरत असताना व्हॉट्स ॲप ग्रुपचे सदस्य प्रा. डॉ. प्रदीप औजेकर यांनी त्यास ओळखले.

Crime
Crime News: 3 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या! 14 वर्षांच्या मुलाचं धक्कादायक कृत्य..

या बाबत त्यांनी पंकज गुजराथी व बालाजी मेडिकलचे संचालक अभय पाटील यांना ही बाब सांगितली असता त्यांनी त्याचा पाठलाग करीत त्यास नवनाथ मंदिर येथे पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

संशयित अल्पवयीन असून, तो चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी असल्याचे समजते. या पूर्वी त्याने अनेक चोऱ्या केल्याचे कबूल केले असून, पोलिस पुढील तपास करीत आहे.

Crime
Crime News: कामावरुन आलेल्या पतीला जेवण देण्यास पत्नीने केला उशीर अन् गेले दोन जीव; वाचा धक्कादायक घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com