Jalgaon Crime News: धक्कादायक! मुलाला सरकारी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत आईचे वर्षभर शोषण

Crime News
Crime Newsesakal

Jalgaon Crime News : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या चाळीसवर्षीय विवाहितेच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष देत तब्बल वर्षभर शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ( Jalgaon crime Luring the child to get a government job Exploitation of the child mother throughout the year )

इतकेच नाही तर, ऑर्डनन्स फॅक्टरीत पीडितेच्या मुलाला लावण्यासाठी अडीच लाख रुपये उकळल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. रामानंदनगर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीत दोन तरुण मुलांची आई असलेली पीडित कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. तिचे, पती खासगी कंपनीत नोकरीला आहेत. पीडितेच्या शेजारी विक्री असलेले घर आपल्याला घ्यायचे आहे, असे म्हणत विनोद रामदास तायडे (रा.भुसावळ ऑर्डिनन्स फॅक्टरी) याने तिच्या कुटुंबाशी ओळख वाढविली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crime News
Jalgaon Fraud Crime : सायबर पोलिसांकडून बंगाली टोळी अटकेत; पर्यटन आवडणाऱ्यांना करायचे टार्गेट

घरी येणे -जाणे वाढल्यावर मी ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असून तुमच्या पैकी कुणाला नोकरीला लावायचे असल्यास सांगा, पण पैसा खर्च करावा लागेल. मी, सरकारी नोकरीला लावून देईल, असे आश्वासन विनोद तायडे याने पीडित व तिच्या कुटुंबीयांना देत विश्वास संपादन केला. यात त्याने तब्बल वर्षभर महिलेवर अत्याचार करून शोषण केले.

कुणास आपल्याबाबत सांगितले तर, तुझ्या मुलाला नोकरीला लावून देणार नाही. म्हणून पीडित आजवर गप्प राहिली. दरम्यान, विनोद तायडे याने पीडितेचा मोठा मुलगा याला नोकरीला लावून देण्याचे आमिष देत अडीच लाख रुपये रोख, पिडीतेचे दागिने लुबाडूनही मुलाच्या नोकरीचे काही होत नाही.

त्यावर विनोद हा उडवा- उडवीची उत्तरे देत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने कुटुंबासह पोलिस ठाणे गाठत विनोद रामदास तायडे याच्याविरुद्ध तक्रार दिली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक गोपाल देशमुख तपास करत आहेत.

Crime News
Jalgaon Crime News : कामगारदिनीच कामगाराची आत्महत्या; कुटूंबीयांना घातपाताचा संशय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com