मिश्रा बंधूंचे कारनामे आयजींच्या कानी! पोलिसांनीच लॉकअपमध्ये पेग पाजल्याचा आरोप

शहर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यात खोटा गुन्हा दाखल करवून घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राजेश मिश्रा, रामेश्वर मिश्रा यांची कारागृहात रवानगी झाली आहे.
crime
crimesakal media

जळगाव : शहर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यात खोटा गुन्हा दाखल करवून घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राजेश मिश्रा, रामेश्वर मिश्रा यांची कारागृहात रवानगी झाली आहे. दोघांना पोलिस लॉकअपमध्ये दारू पाजल्याचे प्रकरण सध्या गाजत असतानाच एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे. वर्ष-२०१७ मध्ये महिला आमदारांना अश्लील मॅसेज पाठवल्याच्या प्रकरणातही या दोघांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

crime
जेवण करताना ताटात कोंबडीने उडी टाकली अन् भावांमध्ये जुंपली

शाहुनगर तपस्वी हनुमान मंदिरातील पुजारी बालकदास बाबा आणि वाळू व्यावसायिक रामेश्वर आणि राजेश मिश्रा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरु होते. बाबाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यावर प्रकरण हातघाईवर गेले. मिश्रा याच्या घरी येवून त्यांच्यावर चॉपरने हल्ला झाला. याचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी शहर पोलिसांना दाखवले. त्यानंतही पोलिसांनी दखल घेतली नाही, म्हणून वाद चिघळत गेला. त्याचे पर्यावसन शाहुनगरातील इम्रान मुल्ला या तरुणावरील कथित तलवार हल्लाप्रकरणात झाले. मात्र, हा खोटा गुन्हा असल्याने त्या प्रकरणात मिश्रा बंधूच अडकले. पोलिस कोठडीत असताना दोघा भावंडांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत दोघा पोलिसांनी बिसलेरी बाटलीत दारू पाजल्याचे व्हिडिओ पाठवून पोलिस अधीक्षकांना तक्रार करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर दोघा भावंडाची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

crime
अनधिकृत व्यावसायिक वापर भोवला; महसूल अधिकारी करणार जागा सील

नेम कुणावर?

एरवी तक्रार घेण्यास नाकतोंड मुरडणाऱ्या पोलिसांनी तडकाफडकी कलम ३०७ ने गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार तीन तरुणांना ताब्यात घेतले. नंतर गुन्हा खोटा असल्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षकांनी शोधून काढल्याने ते सुटले. तर, पोलिस ठाणेच ताब्यात असल्याच्या तोऱ्यात असलेल्या मिश्रा बंधूंना कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला लक्ष करण्याचा बेत आखला गेला होता. मात्र त्यात संबंधित अधिकारी बाजूला राहिले अन्‌ दारु पाजल्याचे प्रकरण उजेडात आले.

crime
पोलिस विभागात चहापेक्षा किटली गरमचा अनुभव; हजेरीमास्तरची कर्मचाऱ्याला दमबाजी

ते कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात

शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये मिश्रा बंधूंना दारु पाजल्याप्रकरणी पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून दोघांची वैद्यकीय तपासणी करुन रक्ताचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेला रवाना करण्यात आले आहे. आयजी बी. जे. शेखर यांच्या आदेशाने या संपूर्ण प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी सुरु आहे. त्या दोघा कर्मचाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होते, याच्यावर पोलिस दलाचे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com