Jalgaon Crime News : रावेर तालुक्यातील चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

Jalgaon Crime News : रावेर तालुक्यातील एका गावात पाच वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने दारूच्या नशेत अत्याचार केला.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : रावेर तालुक्यातील एका गावात पाच वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने दारूच्या नशेत अत्याचार केला. ही घटना रविवारी (ता. १८) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

गावातील पीडित चिमुरडी तिच्या आजीच्या घरी मागील एक महिन्यापासून राहत होती. (five year old girl in Raver taluka was molested by a 65 year old man)

Crime
Nagpur Cyber Crime: नागपुरात सायबर चोरांची वाढली हिम्मत! माजी पोलिस महासंचालकाच्या नावाने लुबाडण्याचा प्रयत्न

दरम्यान, रविवारी (ता १८) दुपारी घरात कोणीही नसताना संशयित वामन बळिराम घटे (बेलदार) (वय ६५) याने या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, संशयित हा गोलवाडे (ता. रावेर) येथील रहिवासी आहे.

या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

त्यास रावेर न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे तपास करीत आहेत.

Crime
Mumbai Crime News : मुंबईत धक्कादायक प्रकार! मृतदेहासोबत कुटुंबाने घालवले 10 दिवस; हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com