Jalgaon Crime News : शेअर बाजारात बुडाल्याने मालकालाच लुटण्याचा डाव

Jalgaon Crime : मालकासोबतच राहुन शेअरबाजारातच गुंतवणूक करत पैसा कमावण्याच्या नादात कर्जबाजारी झालेल्या नोकराने मालकालाच चॉपर लावून लुटण्याचा डाव आखला होता.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime : मालकासोबतच राहुन शेअरबाजारातच गुंतवणूक करत पैसा कमावण्याच्या नादात कर्जबाजारी झालेल्या नोकराने मालकालाच चॉपर लावून लुटण्याचा डाव आखला होता. त्याच्या हातात पैशांची बॅग तर लागलीच नाही. बेड्या मात्र नक्कीच पडल्या आहेत. चहा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या नोकराविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Jalgaon Crime Plot to rob owner due to stock market debt)

शहरातील नेहरु नगरात ओम गोपाल चुघरा हे चहा पावडर व्यापारी मंगळवारी (ता. २६) रात्री ९.३० वाजता नेहरुनगर दिनू दरबारी यांच्या घरासमोरुन जात असताना ओम चुघरा यांची स्कुटी (एमएच १९ डीएन ७८२९) संशयित गौरव खुशाल जयस्वाल (वय २०, रा. नाथवाडा जळगाव) याने अडवून चाकूचा धाक दाखवत स्कुटीला लावलेली पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी गौरव जयस्वाल याला नाथवाडा परिसरातून अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime
Crime News: संभाजीनगर हादरलं! बहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केल्याची भयानक शिक्षा, डोक्यावर चार वेळा बोलेरो घालून केली हत्या

शेअर मार्केटमध्ये चोरीचा प्रयत्न!

गौरव जयस्वाल हा याच व्यापाऱ्याकडे दोन वर्षांपूर्वी कामाला होता ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये पैसे गमावल्याने तो कर्जबाजारी झाला होता. परिणामी, त्याने शक्कल लढवून पुर्वाश्रमीचा मालक चुघरा यालाच लुटण्याचा डाव आखत चॉपर लावला. बॅगही हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तो अपयशी ठरला.

पोलिस अधीक्षक महेश्‍वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल वंजारी, किरण पाटील, चंद्रकांत पाटील, साईनाथ मुंडे, रवी पाटील यांच्या पथकाने संशयित गौरव जयस्वाल याला संध्याकाळी ताब्यात घेतले.

Crime
Crime News: पालिका कर्मचारी असल्याची बतावणी करत महिलेचा विनयभंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com