Jalgaon Crime News : जामनेरला 2 लाखांचा अवैध दारू मुद्देमाल पोलिसांकडून नष्ट

Jalgaon Crime : सात गावठी हातभट्टी अड्यावर धडक मोहीम राबवीत विविध ठिकाणी छापेमारी करून सुमारे २ लाखांची शेकडो लिटर गावठी दारू नष्ट केली.
police Destroyed liquor.
police Destroyed liquor.esakal

Jalgaon Crime News : पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जामनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता.२२) विविध सात गावठी हातभट्टी अड्यावर धडक मोहीम राबवीत विविध ठिकाणी छापेमारी करून सुमारे २ लाखांची शेकडो लिटर गावठी दारू नष्ट केली. पोलिसांच्या कारवाईत संशयित संजय भिल याच्याकडून महुखेडा शिवारातून ८०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे. (Jalgaon Crime Police destroy illegal liquor worth 2 lakhs in Jamner)

पक्के रसायन ३५ लिटर तयार दारू अंदाजे ४३ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल,वाडी शिवार भास्कर देविदास भिल याच्याकडून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल यात ४०० लिटर गाहभची दारू तयार करण्याचे कच्चे,पक्के रसायन, वाडी शिवार पंचफुला युवराज भिल यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीचे तीनशे लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे पक्के रसायन.

वाडी शिवार बनाबाई अभिमान भिल यांच्याकडून २० हजाराचे ४०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे पक्के रसायन, गोंडखेल शिवार युवराज दगडू जाधव राहणार जळगाव शेतमालक, देविदास विठ्ठल कोळी गोंडखेल यांच्याकडून ४० हजाराचे किमतीचे ८०० लिटर दारू तयार करण्याचे कच्चे पक्के रसायन.

police Destroyed liquor.
Latur Crime: इंस्टाग्रामवर धारधार शस्त्र बाळगुन रील बनवणारे दोघे ताब्यात

गोंडखेल शिवार देविदास आनंदा कोळी ४० हजाराचे ८०० लिटर दारू तयार करण्याचे कच्चे पक्के रसायन, गोंडखेल शिवार रामा कौतिक कोळी २० हजाराचे ४०० लिटर गावठी दारूचे रसायन जामनेर पोलिसांनी नष्ट केले.

पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गणेश अहिरे ,चंद्रकांत दवंगे, हेड कॉन्स्टेबल सुनील जोशी, मुकुंद पाटील, राजू तायडे, पोलिस नाईक चंद्रशेखर नाईक, तृप्ती नन्नवरे, निलेश घुगे, ज्ञानेश्वर देशमुख ,सोनासिंग डोभाळ ,महेंद्र राठोड, योगेश पाटील यांच्या पथकाने एकाच दिवसात सात ठिकाणी धडक कारवाया करून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट केला.

police Destroyed liquor.
Nashik Fraud Crime : मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगत 80 लाखांना गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com