Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : ‘तहसील’मधील जप्त वाळूचे वाहन तिघांनी पळवले

Jalgaon Crime : तालुक्यातील किनगाव येथे रविवारी (ता. १७) रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहन ‘महसूल’च्या गस्ती पथकाने पकडले होते.

Jalgaon Crime News : तालुक्यातील किनगाव येथे रविवारी (ता. १७) रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहन ‘महसूल’च्या गस्ती पथकाने पकडले होते. ते वाहन पंचनामा करून तहसील कार्यालयात लावले होते. दरम्यान, मध्यरात्रीनंतर हे वाहन तीन जणांनी तहसील कार्यालयात येऊन मुख्य गेटचे कुलूप तोडून तसेच सीसीटीव्ही कॅमेरा फोडून पळवून नेले. ही घटना सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी यावल पाोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime seized sand vehicle in Tehsil office was run away by 3 suspects)

किनगाव (ता. यावल) परिसरात रविवारी (ता. १७) रात्री तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी वसीम तडवी, शरीफ तडवी, ईश्वर कोळी, मिलिंद कुरकुरे, कोतवाल समीर तडवी हे महसूल विभागाचे अवैध गौण खनिज वाहतूक विरोधी पथक गस्तीवर होते. त्यांना रात्री अवैद्य गौण खनिज वाहतूक करताना अशोक लेलँड कंपनीचे विना क्रमांकाचे वाहन मिळून आले.

तेव्हा पथकाने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना माहिती दिली व हे वाहन पंचनामा करून किनगाव येथून यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले.

Crime
Nashik Crime News : गुजरात महामंडळाच्या एसटीतून मद्याची तस्करी

दरम्यान, सोमवारी (ता. १८) पहाटे चारच्या सुमारास भूषण विठ्ठल कोळी, विठ्ठल भाऊलाल कोळी व स्वप्नील तुषार कोळी यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा फोडून टाकला. नंतर आवारात लावलेले हे विना क्रमांकाचे वाहन पळवून नेले.

हा प्रकार सकाळी निर्दशनास आला तेव्हा या प्रकरणी किनगाव येथील कोतवाल गणेश रमेश वराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात संशयित भूषण कोळी, स्वप्नील कोळी व विठ्ठल कोळी (सर्व रा. रिधूर, ता. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी वासीम तडवी हे तपास करीत आहेत.

Crime
Crime News: कामावरुन आलेल्या पतीला जेवण देण्यास पत्नीने केला उशीर अन् गेले दोन जीव; वाचा धक्कादायक घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com