Jalgaon News : उस कमी त्यात पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भाव; तालुक्यात ऊस शेतीची स्थिती, लागवडीकडे पाठ

Jalgaon News : काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी चोपडा तालुक्यात उसाचे लागवड क्षेत्र घटले असून पुढील वर्षाच्या गाळपासाठी येणारा ऊस कमी झाला आहे.
Sugarcane available for further sieving in Shiwar
Sugarcane available for further sieving in Shiwaresakal

गणपूर : गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी चोपडा तालुक्यात उसाचे लागवड क्षेत्र घटले असून पुढील वर्षाच्या गाळपासाठी येणारा ऊस कमी झाला आहे. दोन वर्षापासून उसावर होणाऱ्या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील काही शिवारात उसाचे उत्पादन अत्यंत कमी झाल्याने ऊस पिक परवडणेच कठीण झाले. (Jalgaon increasing Whitefly infestation in sugarcane)

परिणामी, शेतकऱ्यांनी नवीन वर्षाच्या लागवडीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी येत्या गळीत हंगामासाठी तालुक्यात गाळपासाठी येणारा ऊस कमी झाला आहे. चोपडा तालुक्यात गेल्या दोन-तीन दशकापासून उसाची लागवड केली जाते.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

विशेष म्हणजे पूर्वेकडील अडावद, मंगरूळ गटात व पश्चिमेकडील हातेड व गलंगी गटात उसाची मोठी लागवड होते. मात्र या दोन्ही विभागात गेल्या दोन वर्षात पांढऱ्या माशीची वाढ व प्रादुर्भाव वाढल्याने उसाचे पीक कमालीचे खराब झाले, त्यामुळे ऊस उत्पादकांना एकरी आठ ते बारा टन ऊसावर समाधान मानावे लागेल.

मात्र हे प्रमाण सव्वा वर्षाच्या कालावधीच्या पिकासाठी परवडणारे नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी हे पीक न लावण्याचा निर्णय घेतला आहे. लागवड वाढेल यासाठी चोसाका कडून म्हणजेच बारामती ॲग्रो कडून प्रयत्न होणे ही गरजेचे होते मात्र तसे प्रयत्न होताना दिसून आले नाही. (latest marathi news)

Sugarcane available for further sieving in Shiwar
Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यात 42 उमेदवारांनी नेले 106 उमेदवारी अर्ज

दीड हजार हेक्टरवर उस

यावर्षी तालुक्यात जेमतेम दीड हजार हेक्टरवर उसाचे पीक असेल असा अंदाज आहे. त्यामुळे पुढील वर्षी चोपडा साखर कारखान्याच्या गाळपासाठी बाहेरील उसावरच सर्व मदार असेल हे आतापासून निश्चित झाले आहे.

तालुक्यात लागवड होणाऱ्या उसात इतरही कारखाने ऊस खरेदी करत असल्याने कारखान्यांच्या दृष्टिकोनातून फारच कमी ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. पांढऱ्या माशीचा उपद्रव वाढत गेल्याने उसाचे पीकच खराब झाले.

मात्र त्या त्या क्षेत्रात लागवड घटल्यामुळे यावर्षी आतापर्यंत तरी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव फारच अल्प असल्याने यावर्षी शेतात उभा असलेला ऊस बऱ्यापैकी येईल अशी आशा आहे. अशीच स्थिती राहिल्यास पुढील वर्षासाठी उसाची लागवड वाढण्यास बराच वाव आहे .

Sugarcane available for further sieving in Shiwar
Jalgaon Lok Sabha Constituency : भाजप या वेळी विजयात ‘पास’ होणार की ‘फेल’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com