Jalgaon Crop Insurance : मार्चच्या आत पीककर्ज भरा, व्याज माफ! जळगाव जिल्हा बॅंकेचा निर्णय

Jalgaon Crop Insurance : १ एप्रिल २०२३ पासून तीन लाखांपर्यंत पीककर्ज घेतले आहे, त्यांनी हे कर्ज ३१ मार्चच्या आत भरल्यास अशा शेतकऱ्यांना या कर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.
Crop Insurance
Crop Insuranceesakal

Jalgaon Crop Insurance : ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक १ एप्रिल २०२३ पासून तीन लाखांपर्यंत पीककर्ज घेतले आहे, त्यांनी हे कर्ज ३१ मार्चच्या आत भरल्यास अशा शेतकऱ्यांना या कर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. मात्र ३१ मार्चच्या आत हे कर्ज न भरल्यास असे शेतकरी पुढील कर्जासाठी अपात्र ठरतील. (Jalgaon District Bank decision Crop loan is paid within March interest will be waived)

जिल्ह्यातील एक लाख ९० हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड वेळेत करावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. जिल्हा बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय पवार म्हणाले, की एक लाख ९० हजार शेतकऱ्यांना गेल्या वर्षी एक हजार २०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

त्यावरील व्याजाची रक्कम ७२ कोटी रुपये इतकी आहे, ही रक्कम त्यांना सूट देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकांनी मागील तीन लाखांपर्यंत पीककर्ज वाटप केले होते, त्यांच्याकडून व्याज वसूल करू नये, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. मात्र नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे आदेश दिले होते.

केंद्राच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेऊन यातून मध्य मार्ग काढण्याची विनंती केली, त्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नाशिक येथे स्वतंत्र जळगाव जिल्हा बँकेशी संबंधित सचिव व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. (latest marathi news)

Crop Insurance
Jalgaon Smita Wagh : भाजप उमेदवार स्मिता वाघ यांची एरंडोलला भेट; पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

मात्र त्यानंतरही त्याबाबत सरकारकडून अपयश आले. शेतकऱ्यांचे हित पाहता जळगाव जिल्हा बँकेने आपल्या पातळीवर व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी तीन लाखांचे कर्ज घेतले त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरतील त्यांना चालू वर्षात वाढीव कर्ज दिले जाईल.

‘विकासो’ना अनिष्ट तफावत, व्याज फायदा

जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटींबाबत संजय पवार म्हणाले, की जिल्ह्यात ८७६ विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. त्यापैकी ५५१ संस्था अनिष्ठ तफावतीत आहे. या संस्थांकडे बँकेचे ६४० कोटी रुपये घेणे आहेत.

मात्र बँकेने अनिष्ठ तफावतीत असलेल्या सोसायट्यांकडून व्याज घेणे बंद केले आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या संस्थांनाही ७० कोटी ४० लाखांचा फायदा होणार आहे. गेल्या वर्षी बँकेची ९२ कोटी रुपये वसुली झाली होती, यंदा त्यापेक्षा जास्त होईल, असा अंदाज आहे.

Crop Insurance
Jalgaon Anganwadi Sevika : गावपातळीवर अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची : आमदार चिमणराव पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com