Jalgaon News : रामलल्ला दर्शनासाठी जळगाव-अयोध्या बससेवा

धुळे आगारानंतर जळगाव विभागानेही अयोध्येसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ST Bus (file photo)
ST Bus (file photo) esakal

Jalgaon News : अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर अनेक भाविक रामलल्लाच्या दर्शनाची जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळही आपली बससेवा सुरु करत आहे. धुळे आगारानंतर जळगाव विभागानेही अयोध्येसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. यानंतर आता अयोध्येतील रामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येत जात आहेत. (Jalgaon division has start special bus service for Ayodhya news)

त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाकडून अयोध्येसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात येत आहेत. १० फेब्रुवारीपासून धुळे आगारातून अयोध्येसाठी पहिली लालपरी धावत आहे. यानंतर जळगाव विभागाचीही विशेष बस सेवा सुरु होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील जळगाव, जामनेर, चाळीसगाव, चोपडा व मुक्ताईनगर या आगारातून अयोध्या, प्रयागराज, वाराणसी (काशी) येथे ४२ प्रवाशी थेट जाण्यासाठी उपलब्ध झाल्यास त्यांना ऍडव्हान्स बुकींगनुसार बस पुरविणार आहे.

ST Bus (file photo)
Jalgaon News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव दौरा स्थगित

अयोध्या येथील राम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना या बसद्वारे वाराणसी आणि प्रयागराज या ठिकाणीही जाता येणार आहे. अयोध्येस जाण्यासाठी एका प्रवाशाचे भाडेही निश्चित केले आहे.

अयोध्येसाठी सुटणाऱ्या बसचे भाडे

आगार.................. प्रतिव्यक्ती भाडे

जळगाव ................. ४७१०

जामनेर .................. ४४६०

चाळीसगाव ............... ४७१०

चोपडा .................. ४५५०

मुक्ताईनगर ................ ४३२०

ST Bus (file photo)
Jalgaon News : विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास कारवाई : माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. कुंवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com