Jalgaon News : ‘मार्च एंड’मुळे सुटीच्या दिवशीही कामकाज

Jalgaon : राज्याचे आर्थिक वर्ष उद्या रविवारी ३१ मार्चला संपत असल्याने मागील वर्षीचा अखर्चिक निधीच्या नियोजनासाठी दोन-तीन दिवसांपासून शासकीय कार्यालयांत लगबग सुरू आहे.
Officials and employees working in Treasury Office, Finance Department of Zilla Parishad on Saturday holiday.
Officials and employees working in Treasury Office, Finance Department of Zilla Parishad on Saturday holiday.esakal

Jalgaon News : राज्याचे आर्थिक वर्ष उद्या रविवारी ३१ मार्चला संपत असल्याने मागील वर्षीचा अखर्चिक निधीच्या नियोजनासाठी दोन-तीन दिवसांपासून शासकीय कार्यालयांत लगबग सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, नियोजन समितीसह अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयांत अधिकारी, विभागप्रमुखांसह कर्मचारी तळ ठोकून आहे. मार्च महिना संपण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असून कामाची लगबग सुरू आहे. (Jalgaon Due to financial year of state March end work is also done on holidays)

शुक्रवारी (ता. २९) गुड फ्रायडेच्या सुटीच्या दिवशीदेखील आज शनिवार सुटीचा दिवस असूनही कार्यालयीन कामकाज सुरू होते. जिल्हा परिषदेतील सर्वच विभाग सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्याच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेत 'मार्च एण्ड'ची लगबग पहावयास मिळाली. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकासासाठी शासकीय कार्यालयांना आणि विविध विभागांना कोट्यवधीचा निधी मिळतो. त्यानुसार

या निधीचे नियोजन विविध विभागांना करावे लागते. परंतु, काही अधिकारी, विभागप्रमुख यांच्या दुर्लक्षामुळे निधीचे नियोजन आर्थिक वर्षात केले जात नाही. आर्थिक वर्ष संपता संपता अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुठल्या हेड'चा निधी खर्च केला गेला नाही, यासाठी मग धावपळ करावी लागते. दोन वर्षापुर्वी निधी खर्चात जळगाव जिल्हा शेवटच्या सातात होता.

सहाजिकच यंदा पहिल्या महिण्यापासून निधी परत जाणार नाही, यासाठीची काळजीदेखील शासकीय अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांना वर्षाच्या सरतेशेवटी लगबग आहे. मागीलवर्षी मिळालेला निधी परत जाऊ नये, यासाठी सलग तीन दिवसांच्या सुट्यांतही कार्यालये चालू राहणार आहेत. शुक्रवारी गुड फ्रायडेची सुटी, आज शनिवारची सुटी असतानाही विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी मार्च एण्डची देयके काढण्यात व्यस्त असल्याचे पहावयास मिळाले. (latest marathi news)

Officials and employees working in Treasury Office, Finance Department of Zilla Parishad on Saturday holiday.
Jalgaon Lok Sabha Election : ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबद्दल प्रदेश भाजपकडून चौकशी; भाजपच्या अंतर्गत बैठकीतील कथित वाद

रविवारी कामकाज

उद्या रविवारी (ता. ३१) या दिवसांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरू असणार आहे. मार्चअखेर असल्यामुळे नवीन वाहनांची खरेदी होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव नवीन वाहन नोंदणी व त्यानुषंगाने होणाऱ्या नोंदी व कार्यालयातील कामकाज लक्षात घेऊन ही सूचना जारी करण्यात आली आहे.

वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते एक एप्रिलपासून बदलणार आहेत. मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना यासंबंधीचे कामकाज व दस्त नोंदणीसाठी सर्व दुय्यम निबंधक, सहजिल्हा निबंधक कार्यालये उद्या (ता.३१)पर्यंत रविवारची सुटी असूनही सुरू राहणार आहेत.

५५ कोटींची बिले अदा

जिल्हा कोषागार कार्यालयात २८ व २९ मार्च दोनच दिवसात १५६ देयकांचे पेमेंट देण्यात आले. ५५ कोटी ५५ लाख ३३ हजार ४०० रूपये संबंधितांना प्रदान करण्यात आली आहेत. अजून ३०० देयके प्रलंबित आहेत. ती उद्या (ता.३१) रात्री १२ पर्यंत अदा केली जातील. अजूनही काही देयके येतील. गेल्या तीन दिवसात कोषागार विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी सुटी न घेता काम करीत आहे. अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी दिली.

Officials and employees working in Treasury Office, Finance Department of Zilla Parishad on Saturday holiday.
Jalgaon Lok Sabha Constituency : करण पवार यांची उमेदवारी निश्‍चीत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com