Jalgaon Lok Sabha Constituency : करण पवार यांची उमेदवारी निश्‍चीत?

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. या मतदार संघातून सध्या भाजपत असलेले पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
Karan Pawar
Karan Pawar esakal

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. या मतदार संघातून सध्या भाजपत असलेले पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. करण पवार यांना ठाकरे गटाने आपल्याकडे घेऊन उमेदवारी दिल्यास जळगाव लोकसभा मतदार संघात ‘मशाल’ व ‘कमळा’ची काट्याची लढत होऊ शकते. जळगाव लोकसभा मतदार संघ राजकीय दृष्टीने महत्वाचा आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

या लोकसभा मतदार संघावर गेली तीस वर्षे भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा आहे. भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांची उमेदवारी नाकारून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर केली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष कोणता उमेदवार देणार याकडेच लक्ष आहे.

करण पवार हे सद्या मुंबईत आहेत, त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. करण पवार त्यांच्याकडे जळगाव लोकसभा मतदार संघातील सद्याची स्थिती तसेच मागील लोकसभेत भाजप उमेदवार विजयाची तसेच आता महाविकास आघाडीची मतांची तुलना सादर करून आपण यशस्वी कसे होऊ शकतो याचा लेखाजोखाच सादर केला. (latest marathi news)

Karan Pawar
Loksabha Election 2024 : भीमशक्तीचा काँग्रेसला पाठिंबा ; चंद्रकांत हंडोरे ,राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव

पवारांनी त्यांच्या उमेदवारीला सकात्मकता दर्शविली. मात्र हा मतदार संघ ठाकरे गटाकडे असल्याने त्यांच्याकडून उमेदवारीबाबत करण पवार यांनी निर्णय घ्यावा असे सूचविले. दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही करण पवार यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मकता असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे करण पवार यांचे नाव निश्‍चीत असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (ता.३१) रोजी दिल्लीत आहेत. त्यामुळे ते दिल्ली येथून आल्यानंतरच उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Karan Pawar
Loksabha Election 2024 : बारामतीत ताई विरुद्ध वहिनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com