Jalgaon News : निवृत्ती वेतन धारकांसाठी ई-कुबेर प्रणालीची सुविधा

Jalgaon : ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून थेट पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोशागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी दिली.
Pension
Pension esakal

Jalgaon News : जिल्ह्यातील निवृत्ती वेतन धारकांसाठी जिल्हा कोशागार कार्यालयातून निवृत्तिवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेन्शन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून थेट पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोशागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी दिली. (Jalgaon E Kuber system facility for pensioners)

पेन्शन जमा करण्यासाठी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आयएफएससी कोडनुसार ही पेन्शन जमा होईल. जर काही पेन्शनधारकांनी या कोशागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करून घेतले असेल तर अशा पेन्शन धारकांचे पेन्शन जमा होण्यास अडचणी निर्माण होतील.

तरी ज्या पेन्शन धारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरू ठेवावे.

Pension
Jalgaon Municipality News : ‘मार्चएंड’मुळे पालिकांची करवसुलीसाठी कसरत

भविष्यात पेन्शन बाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पेन्शन धारकांची राहील. जिल्ह्यातील सर्व निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्ती धारकांचे माहे मार्च-२०२४ या महिन्याचे मासिक पेन्शन हे १० एप्रिल २०२४ पर्यंत जमा होईल. याची सर्व पेन्शनधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा कोशागार अधिकारी खैरनार यांनी सांगितले.

Pension
Jalgaon News : पोलिस अधीक्षकांनी गाठले पिस्तुलांचे गाव उमर्टी! तस्करांवर करडी नजर

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com