Fire News: जळगावमध्ये अग्नितांडव! केमिकल कंपनीमध्ये भीषण आग, 4 जण अडकल्याची भीती, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Fire News : केमिकल आग लागल्यानंतर केमिकलचा कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. कंपनीत काम करणारे चार कर्मचारी कंपनीमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
jalgaon fire news
jalgaon fire news Esakal

जळगावमधून भीषण आगीची घटना समोर आली आहे. जळगावमधील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला भीषण आग लागली. यामध्ये आगीत चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मोरया केमिकल कंपनीला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर कंपनीत केमिकलचा मोठा स्फोट झाला. घटना घडली तेव्हा काही कामगार कंपनीत काम करत होते. या दुर्घटनेत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. तर कंपनीत काम करणारे चार कर्मचारी कंपनीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

jalgaon fire news
Viral Video: लिंबू, कुंकू, बाहुली आणि जादूटोणा? माजी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तांत्रिक विधीने खळबळ, पाहा थरारक व्हिडिओ

आगीची माहिती मिळताच जळगाव अग्निशमन दलाचे पथक घटनस्थळी दाखल झाले आहे. तीस ते चाळीस अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

jalgaon fire news
Salman Khan Bodyguard Salary : सलमान साठी जीव द्यायला तयार असणाऱ्या शेराचा पगार किती? बॉडीगार्ड बनण्याआधी होता मिस्टर महाराष्ट्र

केमिकलचा स्फोट होत असल्याने आग आणखी वाढली आहे. आगीचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत. आग अटोक्यात येत नसल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

jalgaon fire news
Mukesh Ambani: अंबानी आर्थिक क्षेत्रात करणार मोठा धमाका; जगातील सर्वात शक्तिशाली कंपनीशी केला करार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com