Jalgaon Fraud News : सारख्या नावाचा व्यक्ती उभा करून जमीन बळकावली

Jalgaon Fraud News : शेतीच्या बनावट कागदपत्रांसह सारख्या नावाचा व्यक्ती उभी करून जमीन परस्पर खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. २०) समोर आला.
Fraud
Fraudesakal

Jalgaon Fraud News : शेतीच्या बनावट कागदपत्रांसह सारख्या नावाचा व्यक्ती उभी करून जमीन परस्पर खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. २०) समोर आला. पाच संशयितांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड (पुणे) येथील रामदास भगवानदास पेसवाणी यांनी वर्ष २०११ मध्ये नशिराबाद शिवारात शेतजमीन खरेदी केली होती. त्यांनी तेथे चारही बाजूला तारेचे कुंपण करून त्यांच्या नावाचा फलक लावला होता.

या शेतजमिनीपैकी १२ आर जमीन ही राष्ट्रीय महामार्गासाठी भुसंपादित झाली असून त्याचा मोबदला पेसवाणी यांना अद्याप मिळालेली नाही. डिसेंबर २०२३ मध्ये रामदास पेसवाणी यांना त्यांच्या नातेवाइकांनी नशिराबाद येथील जमिनीचे बोगस कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत बनविल्याचे सांगितले.

त्यात पेसवाणी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. शेतजमिनीची खात्री करण्यासाठी पेसावणी यांचे भाऊ अजय पेसवाणी हे १६ जानेवारी रोजी नशिराबाद येथे गेले असता यावेळी त्यांच्या भावाच्या जमिनीवर हॉटेलचा फलक दिसला.

Fraud
Nagpur Crime: मनोरुग्ण मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला २० वर्षांची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय

पेसवाणी यांनी वकिलामार्फत संबंधित कार्यालयात जाऊन त्या जमिनीच्या कागदपत्रांची नक्कल काढली असता यामध्ये रामदास पेसवाणी यांच्या नावामध्ये साधर्म्य असणाऱ्या चाळीसगाव येथील बनावट व्यक्तीसह १८ मे २०२२ रोजी खरेदीखत केले असल्याचे आढळून आले.

त्यावर साक्षीदार म्हणून जळगावातील दोन साक्षीदारांच्या स्वाक्षरी आहेत. जमीन हडपण्यासाठी पाच जणांनी संगनमताने बनावट कागदपत्रांसह जमिनीचे बनावट मालक उभा करून केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud
Jalgaon News : दिव्यांगाचे मनपासमोर आंदोलन; 5 टक्के निधीची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com