जळगाव रुग्‍णालय इमारतींना प्रत्‍यक्ष मोजमापाने करआकारणी करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hospital

जळगाव रुग्‍णालय इमारतींना प्रत्‍यक्ष मोजमापाने करआकारणी करावी

जळगाव : मनपाद्वारे डॉक्टर(Doctor), हॉस्पिटलसंबंधित (Hospital) विविध करांची आकारणी नियमबाह्य व अन्यायकाराक आहे. प्रामुख्‍याने अग्निशमन(Firefighting) सेवेसाठी चार वेगवेगळ्या नावांनी करआकारणी तसेच रुग्णालय इमारतींची प्रत्‍यक्ष मोजणी न करता मनमानी पद्धतीने करआकारणी केली आहे. यामुळे प्रत्‍यक्ष मोजमाप करून करआकारणी करण्याची मागणी जळगाव ‘आयएमए’ची असल्‍याची माहिती ‘आयएमए’चे सचिव डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा: पोलिसाकडून लग्नाच्या आमिषाने अत्याचार

आयएमए सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस राज्‍य सचिव डॉ. अनिल पाटील, जळगावचे अध्‍यक्ष डॉ. सी. जी. चौधरी उपस्थित होते. डॉ. चौधरी यांनी सांगितले, की अग्निशमन सेवेसाठी चार वेगवेगळ्या नावांनी कर जळगाव मनपाद्वारे दवाखान्यांना आकारला जातो. एकाच प्रकारच्या सेवेसाठी चार नावांनी कर आकारणे नियम व कायद्याला धरून नाही. यात अग्निशमन अनामत, अग्निशमन कर (दोन टक्‍के), अग्निशमन सेवा कर (५०००-७५००) व बांधकाम क्षेत्राच्या १२ रुपये प्रतिचौरस मीटर असा कर आकारला जात आहे. तसेच मनपाने शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकनाच्या नावाने डॉक्टरांना पुन्हा अवाजवीरीत्या प्रस्तावित केलेली बिले दिली आहेत.

हेही वाचा: शिर्डीत कोविड रुग्णालय सुरू करा : लोखंडे

वापराचे प्रयोजन बदलले नसताना तसेच कोणतेही नवीन वाढीव बांधकाम नसताना दोन-तीनपट वाढीव करआकारणी केली आहे. बेसमेंट वापरात नसूनही अरहिवास या हेडिंगमधे वाढीव कर आकारला आहे. यामुळे मनपाने अग्निशमन बाबतीत मनपा अधिनियमांना धरून एकसूत्री करआकारणी करावी. इतर बेकायदेशीर हेडिंग खालील करआकारणी तातडीने रद्द करावी. नवीन फेरमूल्यांकनातील अरहिवास घनकचरा कर रद्द करावा. तसेच हरकतदार डॉक्टरांच्या इमारतींना मागणीनुसार भेट देऊन मोजमाप करून योग्य ते बदल करून नव्याने आकारणी करावी; अशा मागण्या ‘आयएमए’तर्फे करण्यात आल्‍या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonHospital
loading image
go to top