Jalgaon Power Cut : वीज गळतीचा भार; सर्वसामान्य बेजार; ‘डीपी’वरील लोड वाढल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ

Jalgaon News : वीज अधिक प्रमाणात लागते व खिशाला फटका बसतो म्हणून वीज चोरट्यांनी शक्कल लढवून बिनधास्तपणे विजेचे मीटर बंद करणे, आकडे टाकणे, असे प्रकार सर्रास दिसत आहे.
Power Cut
Power Cut esakal

भुसावळ : सध्या उन्हाळा सुरू झाल्याने तापमानाचा पारा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. या तापमानापासून बचाव होण्यासाठी कुलर, एसी, पंखे, फ्रीज यासारख्या उपकरणांच्या वापरासाठी वीज अधिक प्रमाणात लागते व खिशाला फटका बसतो म्हणून वीज चोरट्यांनी शक्कल लढवून बिनधास्तपणे विजेचे मीटर बंद करणे, आकडे टाकणे, असे प्रकार सर्रास दिसत आहे. (Jalgaon Increase in frequency of power outages due to increase in load on DP)

या प्रकाराकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने वीज चोरट्यांचे चांगलेच फावले असून, शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वीच वीजबिल थकबाकीदारांची वसुली करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र राज्य वीज वितरण कंपनीला यश आले, हे सांगणे कठीण आहे.

कारण शहरातील काही राजकीय पुढाऱ्यांची तसेच गावगुंडांची मोठी प्रमाणात थकबाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यासाठी वीज वितरण कंपनीने शहरात थकबाकी भरणा करण्यासाठी वारंवार सूचनाही दिल्या होत्या. या व्यतिरिक्त बीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा देखील दिला होता.

मात्र याचा फटका जे ग्राहक नियमित वीज बिल भरणा करतात. त्यांना पैसेअभावी काही प्रमाणात बसला. पण जे ग्राहक वीज चोरी करतात. त्याच्या दोन हात दूर राहण्यातच वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला फायदा असल्याचे समजले. अशा चोरट्यांचा प्रशासन बंदोबस्त लावण्यासाठी भरारी पथके पाठवून वीज मीटर बंद करणाऱ्यांवर फौजदार गुन्हे दाखल करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. (Latest Marathi News)

Power Cut
Jalgaon Bhavani Mata Yatra : भवानी माता यात्रोत्सवाला 5 दिवस परवानगी; यंदाची यात्रा उत्साहात

गृहिनी त्रस्त, अधिकारी मस्त...

सध्या वीज वितरण कंपनीची मनमानी सुरू आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ एवढेच नव्हे तर भर रात्री सुद्धा वीज गूल होत असल्याने गृहिणींना घरकाम करण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज गूल होऊनही वीजबिल मात्र कमी देण्याऐवजी वाढीव वीज वितरण कंपनी पाठवीत आहे. या दररोजच्या वीज गूल होण्याच्या खेळाला गृहिणी त्रस्त झाले असून, अधिकारी मात्र वातानुकूलित खोलीमध्ये मस्त असल्याचे दिसत आहे.

बांधकामांवर फुकटची वीज

भुसावळ शहरात चारही बाजूंना घर बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र इमारत बांधकामासाठी लागणारे सहित्य कापण्यासाठी वीज असणे गरजेचे आहे. परंतु बरेच ठिकाणी ठेकेदार खर्च वाचविण्यासाठी सरळ विजेच्या तारांवर आकोडे टाकून सहित्य कापत असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.

कामे रखडली..

नागरिकांची दैनंदिन कामे करण्यासाठी एखादे शासकीय कार्यलयामध्ये गेले असता वीज गूल असल्यामुळे त्यांच्या कामांना ब्रेक लागत आहे. आधीच सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागतो. त्यात वीज गूल होत असल्याने शासकीय, निमशासकीय कामे रखडली आहेत.

Power Cut
Jalgaon News : चोपड्याला 27 हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी; तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

वीजमीटर बंद, इतरांना भुर्दंड

कित्येक वर्षांपासून शहरामध्ये काही भागांमध्ये वीज मीटर बंद अवस्थेत असून, कितीही वापर केल्यास शंभर ते दोनशे रुपयांच्या वर वीज बिल येणार नाही, अशी व्यवस्था ग्राहकांनी केल्याने बिनधास्तपणे चोवीस तास लाईट, पंखे, एसी, फ्रीज, हिटर अशा उपकरणांचा वापर होत आहे. मात्र मीटर बंद करणारे ग्राहकांना सर्व सुविधा भोगयला मिळत असून इतरांना यांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

‘डीपी’वर भार..रुग्णांचे हाल

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येक घरामध्ये एक तरी रुग्ण आहे. वीज वारंवार खंडित होत असल्याने या रुग्णांना उकाड्यामुळे घरात राहणे देखील कठीण होत आहे. बाहेर आल्यास तीव्र उन्हामुळे डोळे दीपत आहे. यात वीज चोरट्यांमुळे डीपीवरील लोड वाढत असल्याने तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. अशा परिस्थितीत रुग्णांचे काही कमी जास्त झाल्यास याला जबाबदार कोण राहणार? असा सवाल नागरिकांकडून होत आहे.

Power Cut
Jalgaon News : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी 16 भरारी पथकांची स्थापना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com