Lok Adalat : जामनेरला 28 वर्षांपासूनचा जुना वाद निकाली; लोकन्यायालयात एकूण 190 प्रकरण निकाली

Lok Adalat : तब्बल २८ वर्षापासून न्यायालयात सुरु असलेल्या वादात लोकन्यायालयात मिटविला गेला.
Lok Adalat
Lok Adalat esakal

Lok Adalat : तब्बल २८ वर्षापासून न्यायालयात सुरु असलेल्या वादात लोकन्यायालयात मिटविला गेला. तर कौटुंबिक वादातील चार जोडपी पुन्हा परस्पर सहमतीने एकत्र नांदू लागली. जामनेरला काल झालेल्या लोकन्यायालयात प्रथम दिवाणी व फौजदारी न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष अध्यक्ष, दि.न.चामले, सह दिवाणी न्यायाधीश बी.एम.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधीज्ञ अॅड. व्ही.एस. पाटील व अॅड पी एन देशमुख यांनी पुढाकार घेत, जुने वाद मिटविले. (Jalgaon Lok Adalat Jamner settled 28 years old disputes)

राज्य सेवा विधी प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समितीतर्फे जामनेर न्यायालयात झालेल्या लोकअदालतीत १४३ प्रकरण निकाली काढण्यात आली. लोकन्यायालयात वादपूर्व १३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली त्यात, तडजोडी अंती ५० लाख २९ हजार ७८७ रकमेची वसुली झाली.

तर प्रलंबित दिवाणी व फौजदारी तडजोड योग्य प्रकरणात १५ लाखाहून अधिक रकमेची तडजोड झाली. वादपूर्व आणि न्यायालयीन अशा १९० निकाली प्रकरणात ६५ लाख ४९ हजार ७९६ रक्कमेची तडजोड अंती वसूली झाली. (latest marathi news)

Lok Adalat
Jalgaon News : आर्चीने जिंकली प्रेक्षकांची मने

लोकन्यायालयाचे पॅनल प्रमुख, तर अॅड.पी.डि. रोझतकर यांनी पॅनल विधीज्ञ म्हणून काम पाहिले. वकील संघाचे अध्यक्ष, अॅड. बी एम चौधरी, सचिव अॅड एम बी पाटील, सरकारी वकील अनिल डि. सारस्वत, अॅड. कृत्तिका भट, अॅड. आर आर चव्हाण.

जेष्ठ विधीज्ञ ए पी डोल्हारे, एस एम सोनार,एस.एम साठे,पी डी पाटील,आर बी पाटील, बी एन बावीस्कर,डि बी बोरसे पी एन देशमुख,एन टि चौधरी, डि.व्ही राजपुत,पी के सोनार,व्ही पी वंजारी,डि.जी पारळकर, अॅड. भुसारी, अॅड. सोनवणे,के पी बारी,पी जी शुक्ला आदींसह नागरिकही उपस्थित होते.

Lok Adalat
CM Shinde Jalgaon Daura : पुलाच्या कामासाठी ‘नाबार्ड’मधून निधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com